Telegram च्या या फीचरने फुटला NEET चा पेपर
मुंबई, दि. १६ : NEET पेपर फुटी प्रकरणात आरोपींनी टेलिग्रामच्या तांत्रिक सुविधांचा गैरवापर केला. व्हॉट्सॲपवर मोठ्या फाईल्स पाठवण्याची मर्यादा असताना, टेलिग्रामच्या Large File Sharing फीचरमुळे 2 ते 4 GB पर्यंतच्या हाय-क्वॉलिटी स्कॅन PDF क्षणात अपलोड-डाउनलोड करता आल्या. त्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या मूळ प्रश्नपत्रिका अवघ्या काही तासांत हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या.
“Private Mafia” नावाच्या गुप्त ग्रुपमध्ये आरोपींनी मोबाईल नंबर न दाखवता केवळ युझरनेम वापरून प्रवेश केला. एका ग्रुपमध्ये 2 लाख सदस्यांची मर्यादा असल्याने पेपर देशभरातील कोचिंग सेंटर्सपर्यंत पोहोचला. याशिवाय, Secret Chat फीचर वापरून मेसेज ठराविक वेळेनंतर आपोआप डिलीट होण्याची सोय करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला.
CBI आणि राजस्थान SOG ने डिजिटल ट्रेल (IP Address) व आर्थिक व्यवहारांचा माग काढत अहिल्यानगरचा शुभम खैरनार याला अटक केली. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने हेअरस्टाईल बदलून रूप बदलले होते, पण सायबर सेलने नाशिकमध्ये त्याला ताब्यात घेतले.
SL/ML/SL