मुंबई मनपातील चतुर्थ श्रेणी कामगारांना जनगणनेच्या कामासाठी पाठवू नये

 मुंबई मनपातील  चतुर्थ श्रेणी कामगारांना जनगणनेच्या कामासाठी पाठवू नये

मुंबई प्रतिनिधी, दि. 16 : मुंबई शहरामध्ये सध्या जगनणनेच्या नोंदणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जगनणनेचे काम हे देशाच्या व राष्ट्राच्या हिताचे काम आहे हे जरी खरे असले तरी ऐन कडक उन्हाळ्यामध्ये मुंबई महापालिकेतील चतुर्थे श्रेणी कामगारांना त्यांना नेमून दिलेले काम करून जनगणनेच्या कामासाठी पाठवून संध्याकाळी उशीरापर्यंत काम करून घेतले जात आहे. चतुर्थ श्रेणी कामगारांमध्ये बहुसंख्य कामगार हे अशिक्षीत असून त्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही. काही कामगार फक्त फोन घेण्यासाठी आणि करण्यासाठी साध्या कि-पॅड फोनचा वापर करीत आहेत, परंतु ज्या कामगारांना त्यांची ड्युटी करून जनगणनेच्या कामासाठी पाठविले जात आहे अशा बहुतांश कामगारांकडे स्मार्ट फोन नसल्यामुळे, स्मार्ट फोन वापरून नागरिकांच्या नोंदी आणि इतर माहिती नोंदविणे याचे कौशल्य नसल्यामुळे जनगणनेची माहिती संकलन करून ती त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविणे शक्य होणार नसल्यामुळे चतुर्थ श्रेणी कामगार वर्गामध्ये चिंतेचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष श्री. अशोक जाधव यांनी दिली आहे.

सकाळी ११.०० वा. नंतर भर उन्हात उष्णतेच्या लाटेमध्ये स्वतःचे दिलेले काम पार पाडून जनगणनेच्या कामासाठी त्याच मळक्या गणवेशामध्ये इमारती अथवा टॉवरमध्ये जावे लागत आहे. परंतु अशा अवस्थेत अनेक नागरीक कामगारांना दरवाजासमोर उभे करत नाहीत. दुहेरी कामामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून कामगार कोणत्याही क्षणी संघटीत कृती करतील अशी भीती अध्यक्ष श्री. अशोक जाधव यांनी व्यक्त केली आहे.

जनगणना हे देश व राष्ट्र हिताचे काम असल्याचे आमच्यासहीत सर्वांनाच याची कल्पना असून ऐन कडक उन्हाळ्यामध्ये ही कामे करून घेण्यात येऊ नयेत, अशी कळकळीची विनंती मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी फडणवीस साहेब व मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुमित्रा पवार मॅडम यांना करीत असून, त्याबाबतचे निर्देश महापालिकेच्या आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे मॅडम यांना देऊन कडक उन्हाळ्यामध्ये कोणत्याही कामगारांना जनगणनेची कामे देण्यात येऊ नयेत. सध्या मुंबई महापालिकेमध्ये ७५,००० पेक्षा अधिक निरनिराळ्या प्रवर्गातील रिक्त जागा असून कार्यरत असलेल्या कामगारांवर दुप्पट कामाचा बोजा पडत आहे. अशा कठिण परिस्थीत आहे त्या कामगारांना जनगणनेच्या कामासाठी पाठविले जात असल्यामुळे मुंबईच्या नागरी सेवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता संघटनेचे अध्यक्ष श्री. अशोक जाधव यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे की, जरी जनगणनेचे काम हे देश व राष्ट्र हिताचे असले तरी सदर कामगारांच्या अडचणी व सदर कामगारांमध्ये निर्माण होणाऱ्या त्रुटी हे लक्षात घेऊन सदर कामगारांना या कामासाठी न जुंपण्यात येऊ नये. सदर कामासाठी महाराष्ट्र आणि मुंबई शहरामध्ये लाखो सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवती यांना जनगणनेचे काम देऊन त्यांच्या रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे पहावे, अशी कळकळीची विनंती श्री, अशोक जाधव यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

प्रसिध्द करण्यात येणाऱ्या पत्रकाद्वारे मा. मुख्यमंत्री, दोन्ही मा. उपमुख्यमंत्री व मा. महापालिका आयुक्त यांना विनंती करण्यात येत आहे की, कडक उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता, कामगारांच्या कुटुंबामध्ये लग्न सराई व इतर शुभ कार्ये लक्षात घेता तसेच कोकण व इतर शहरात मुलांच्या सुट्टीच्या कालावधीत सर्व परिवारासहीत गावी जात असल्याचे लक्षात घेता कामगार वर्गाचे हित जपण्यासाठी तातडीने गनगणनेचे काम हे अपुऱ्या व कमी शिक्षण झालेल्या कामगारांकडून न करून घेता जे बेरोजगार व सुशिक्षीत तरुण वर्ग आहे त्यांच्याकडून करून घेतल्यास त्यांना रोजगार तर मिळेलच त्याहून सदर काम हे कोणत्याही त्रासाशिवाय व त्रुटीशिवाय सुरळीतपणे पार पडू शकेल. त्यामुळे त्याबाबत त्वरीत सरकारने व महापालिका प्रशासनाने धूमिका घ्यारी अशी मागणी अध्यक्ष श्री. अशोक जाधव यांनी केली आहे.

तसेच चतुर्थ श्रेणा कामगारांना स्वतःचे काम करून ते पूर्ण झाल्यानंतर कडक उन्हाळ्यामध्ये जनगणनेचे काम देण्यात आल्यामुळे कामगारांमध्य तीव्र असंतोष पसरलेला आहे हे लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेऊन सदर कामगार वर्गाला जनगणनेच्या कामातून वगळून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी केली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *