संसदेच्या बंधनामुळे अमेरिका आणि इराण दरम्यानचे युद्ध संपल्यात जमा ?

 संसदेच्या बंधनामुळे अमेरिका आणि इराण दरम्यानचे युद्ध संपल्यात जमा ?

वॉशिग्टन डीसी, दि. 1 : अमेरिका आणि इराण युद्धाला आता ४० दिवस उलटून गेले असताना युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. तरीही एका तांत्रिक कारणामुळे हे युद्ध संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या कायदा वॉर पावर रिझॉल्यूशननुसार अमेरिकेचे राष्ट्रापती संसदेच्या मंजूरीशिवाय कोणतंही युद्ध फक्त 60 दिवस सुरू ठेवू शकतात, त्यानंतर त्यांना ते युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये संपवावचं लागतं. जर युद्ध सुरूच ठेवायचं असेल तर राष्ट्रपतींना काँग्रेसची परवानगी घ्यावी लागते. किंवा जर संसदेची परवानगी मिळाली नाही तर संसदेकडे युद्ध सुरू ठेवण्यासाठी 30 दिवसांची अतिरिक्त मुदत मागावी लागते, या युद्धाला आता दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे, मात्र अजूनही ट्रम्प यांनी काँग्रेसकडे परवानगी मागितलेली नाही, त्यामुळे हे युद्ध जवळपास संपल्यात जमा असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

इराणसोबत सुरू असलेलं युद्ध आता संपलं आहे, अशी घोषणा ट्रम्प प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या युद्धाची डेडलाइन 60 दिवसांची ठेवण्यात आली होती, मात्र त्यापूर्वीत दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. आता याबाबत ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आली आहे. हे युद्ध संपल्यात जमा असल्याचं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. तसेच 7 एप्रिलनंतर दोन्ही देशांमध्ये एकदाही ड्रोन किंवा मिसाईल हल्ला झालेला नाही, तसेच गोळीबार देखील झाला नसल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *