मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक (Missing Link) प्रकल्पाचे लोकार्पण.

 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक (Missing Link) प्रकल्पाचे लोकार्पण.

मुंबई दि १ – रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली येथे १ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक (Missing Link) प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) साकारलेला हा प्रकल्प घाटातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवास सुरक्षित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे प्रवासात बचत होत असून हा प्रकल्प १५ ते २० मिनिटांचा वेळ वाचवतो आणि प्रवासाचे अंतर ६ किमीने कमी होणार आहे.

या प्रकल्पात जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक (२३.७५ मीटर रुंद) आणि १८२ मीटर उंच केबल-स्टेड पुलाचा समावेश आहे. या नवीन मार्गामुळे धोकादायक खंडाळा घाटातून जाण्याची गरज उरणार नाही. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये एक नवीन मैलाचा दगड ठरला आहे.

कठीण भौगोलिक परिस्थितीत MSRDC ने साकारलेला हा प्रकल्प अभियांत्रिकीचा उत्तम नमुना आहे.

प्रवासाचा वेळ २५–३० मिनिटांनी कमी

अंतर ६ किमीने कमी

बोगद्यांची एकूण लांबी ८.९२ किमी

१८० मीटर उंच केबल-स्टेड पूल

५ रिश्टर स्केल भूकंप सहनशक्ती

८-पदरी, सिग्नल-फ्री मार्ग
प्रकल्प खर्च: ₹६,६९५.३७ कोटी

टोल वाढ नाही.

यामुळे खंडाळा घाटातील कोंडीला कायमचा दिलासा मिळाला असून प्रवास जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. या मिसिंग लिंक मध्ये असणाऱ्या दुहेरी बोगद्यांची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली असून आजच्या उद्घाटनाच्या दिवशी याबाबतचे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

ML/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *