या ग्रामपंचायतीने सुरू केले जनावरांसाठी अत्याधुनिक स्नानगृह
सातारा, दि. 17 : जिल्ह्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यात पहिल्यांदाच जनावरांसाठीअत्याधुनिक स्नानगृह सुरू केले आहे. याला पाळीव प्राण्याचे ‘ब्युटी पार्लर’ म्हणून ओळखले जात आहे. नदी-ओढ्यांतील प्रदूषण रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने हा स्तुत्य निर्णय घेतला आहे. या ग्रामपंचातीला आजवर महाराष्ट्रासह देशभरातून तब्बल ८२ पुरस्कार मिळाले आहेत.
गावाला देशपातळीवर उत्कृष्ट ग्रामपंचायतीचा सन्मानही मिळालेला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या गावातील मान्याचीवाडी ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षांपासून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या या गावाला देशपातळीवर उत्कृष्ट ग्रामपंचायतीचा सन्मानही मिळाला आहे. आता या ग्रामपंचायतीने जनावरांसाठी अत्याधुनिक स्नानगृह उभारून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
हे स्नानगृह अत्यंत सुसज्ज आणि सर्व सोयींनी युक्त आहे. यात शॉवर, स्वच्छ पाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्यावर प्रक्रिया अशा सुविधा उपलब्ध आहेत. ‘शासनाकडून नेहमीच सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर उपक्रम राबविले जातात. मात्र जनावरांना धुण्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाबाबत कोठेच कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. मात्र आमच्या या उपक्रमामुळे या प्रदूषणाला चाप बसेल’, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
SL/ML/SL