जपानच्या कंपनीत मराठी माणसाची ७५ टक्के मालकी

 जपानच्या कंपनीत मराठी माणसाची ७५ टक्के मालकी

पुणे, दि. १७ : पुण्याच्या चंद्रकांत गायकवाड यांच्या स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीने काल जपानमध्ये शार्प कंपनीसोबत शेअर ॲग्रीमेंट करार केला आणि 75 टक्के शेअर्स विकत घेतले. ज्यामुळे आता पुणेस्थित असलेल्या या जपानच्या कंपनीवर मराठी माणसाची मालकी असणार आहे. सध्या या कंपनीत 80 कर्मचारी काम करत असून या कर्मचाऱ्यांची जबाबदारीही स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीने घेतली आहे. स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी ही हाऊस किपिंग, मॅन पॅावर सप्लायसह विविध क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल दीड हजार कोटी रुपयांची आहे.

शार्प कंपनीवर ताबा मिळवल्याने स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीचा विस्तार वाढला असून येत्या काळात सेमीकंडक्टर निर्माण करण्याच्या क्षेत्रातही कंपनी पाऊल टाकणार आहे. तसंच शार्प कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पुन्हा एकदा प्रत्येक भारतीयांपर्यंत नेण्याचा प्रयत्न कंपनीचा असणार आहे.

द्रकांत गायकवाड हे फॅसिलिटी मॅनेजमेंट आणि मॅन पॅावर सप्लाय क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव. दीड हजार कोटी रूपयांचा टर्नओव्हर असलेल्या स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीचे ते सर्वेसर्वा….महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांमध्ये सुमारे 40 हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी त्यांच्या याच कंपनीमार्फत सेवा बजावतात. केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादीत न राहता राजस्थान, मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश, तेलंगणा, दिल्लीसह इतर 10 राज्यांतही त्यांच्या कंपनीचा विस्तार झाला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *