गटबाजी संपवून एकसंघ रिपब्लिकन पक्ष वाढविण्याच्या आवाहनाला समाजातून मोठा प्रतिसाद – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 गटबाजी संपवून एकसंघ रिपब्लिकन पक्ष वाढविण्याच्या आवाहनाला समाजातून मोठा प्रतिसाद – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि २३- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर पोहोचविला आहे. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट आहेत. राज्याबाहेर मात्र गटबाजी नाही. देशभरात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशात मी रिपब्लिकन पक्ष पोहोचविला असून तिथे इतर कोणतेही रिपब्लिकन गट नाहीत.त्यामुळे एकच रिपब्लिकन पक्ष एकसंघपणे मजबूत उभा रहावा यासाठी रोज नवे गट स्थापन करणे बंद केले पाहिजे. नवे रिपब्लिक गट स्थापन करण्यापेक्षा एकाच रिपब्लिकन पक्षात आपले छोटे मोठे गट विसर्जित करून व्यापक मजबूत एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभा केला पाहिजे असे आपण आवाहन केल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात समाजातून प्रतिसाद मिळत आहे.रिपब्लिकन सेने चे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाश खंडागळे यांनी आज त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह माझ्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली. यापूर्वी आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मिलिंद सुर्वे यांनी आपला गट रिपब्लिकन पक्षात विलीन करून त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे.राज्यात अनेक ठिकाणी छोट्या संघटना आणि रिपब्लिकन गट हे रिपब्लिकन पक्षाची एकजूट व्हावी या विचाराचे आहेत.एकसंघ रिपब्लिकन पक्षासाठी अनेक गट माझ्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात विलीन होण्यास मोठा प्रतिसाद देतील असा मला विश्वास आहे असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.
वेगळा नवीन रिपब्लिकन गट काढून गटबाजी वाढवण्यापेक्षा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात विलीन होऊन एकसंघ रिपब्लिकन पक्ष मजबुत उभा केला पाहिजे. त्यासाठी आपण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर अतुट विश्वास ठेवुन रिपब्लिकन पक्षात प्रवेश करीत असल्याचे सांगत रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाश खंडागळे यांनी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षात जाहीर प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे आशिर्वाद घेवुन त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. रिपब्लिकन पक्षात केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाश खंडागळे यांचे स्वागत केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे ; राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे; राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबलकर; मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड; मुंबई सरचिटणीस विवेक पवार; जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव, दयाळ बहादुर आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष प्रकाश खंडागळे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी रिपब्लिकन सेनेचे मायनॉरिटी मुंबई अध्यक्ष सादिक शेख, उपाध्यक्ष समसुद्दीन शेख, मुंबई सेक्रेटरी सुलतान सिद्दीकी, जॉइंट सेक्रेटरी मुंबई शाहबाज शेख, मुंबई सल्लागार सरफराज सिद्दीकी, लतिफ शेख, मुंबई समन्वयक मुजीब अन्सारी, इब्राहिम शेख, मा. फिरोज शेख अध्यक्ष अंधेरी तालुका रिपब्लिकन सेना व टीम जमीर खान, शमशेर अन्सारी, इस्माईल शेख, सैफ खान, वसीम शेख, साहिल शेख तसेच रोहित प्रकाश खंडागळे युवा नेते रिपब्लिकन सेना व टीम मा. सुनिल तेली नेते मातंग समुदाय,समीर खोत नेते मातगड मुस्लिम समुदाय, सुनिल गायकवाड अध्यक्ष वॉर्ड क्र. 75, रिपब्लिकन सेना व टीम एकनाथ देसाई , दिनेश रोकडे, राज कांबळे, चेतन गायकवाड, आदित्य कांबळे, विकास कवळे, अमोद यादव, दत्ता एकरुपे, राजु जैन, अनिल सखारे, अमर मोहिते, सुरेश वाल्मीकी, राकेश काटकर, सुरज नोहार, नरेश अहिरे, अण्णा दुराई तमील सेना कार्यकर्ता, सलीम शेख उपाध्यक्ष मुंबई प्रदेश कमेटी रिपब्लिकन सेना, अरुण सोनावणे अध्यक्ष घाटकोपर पश्चिम रिपब्लिकन सेना, राजाराम टोके पत्रकार विभाग, युसुफ मेहबूब शेख रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष मुंबई उपाध्यक्ष संगाता माने – शितोळे वंचित मा. उपाध्यक्षा, सायना सय्यद शिवसेना महाराष्ट्र उपाध्यक्षा, खैरुनिशा रिपब्लिकन सेना तालुका महासचिव, चेतना मगर शिवडी विधानसभा समाजसेविका, दिलीप रामचंद्र शेजवळ वंचित बहुजन आघाडी उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष आणि त्यांची टीम, अनवर शेख खान अंबोली विधानसभा मुंबई, मोईनुद्दीन हुसेन शेख कार्यकर्ता वंचित, बशिर इब्राहिम, शेख कार्यकर्ता वंचित, अंधेरी पश्चिम 61 वॉर्ड उपाध्यक्ष रोशन अन्सारी वर्धा विधानसभा वार्ड अध्यक्षा समाजसेविका, ज्योती यादव रिपब्लिकन सेना मुंबई संघटक आणि त्यांची टीम निविदीता शेलार वॉर्ड क्र. 147 रिपब्लिकन सेना अध्यक्ष, पुष्पा भल्लाल अंधेरी पूर्व रिपब्लिकन सेना अध्यक्ष, रोहिणी शिरपूरकर गोरेगांव, नंदिनी शेलार विरार, वंदना जाधव भांडुप, स्मिता गौरव ठाणे, रजनी विश्वकर्मा घाटकोपर, दिव्या बल्लाळ गोरेगांव, आशा कसबे चेंबुर, छाया पगारे घाटकोपर, रोशनी पाठक मीरा रोड, रागिणी संगारे गोरेगांव आदी अनेक मान्यंवर उपस्थित होते.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *