सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणारा अभिनव उपक्रम
सोलापूर, दि. १ : सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (IPS) यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबविला आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच पोलीस पाटलांना प्रोत्साहन देण्यासाठी पोटफाडी चौकाजवळील सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पेट्रोल पंपावर सेंद्रिय भाजीपाला व फळांचा आठवडी स्टॉल सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट देत पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले.