मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ ची ‘गिनीज बुक’ मध्ये नोंद

 मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ ची ‘गिनीज बुक’ मध्ये नोंद

मुंबई, दि.‌३० : मुंबई -पुणे अंतर कमी करणारा खंडाळा घाटातील कठीण डोंगराळ भागात साकारलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आता जगाच्या नकाशावर चमकणार आहे. या प्रकल्पातील 23.75 मीटर रुंदीचे जुळे बोगदे जगातील सर्वात रुंद बोगदे ठरले आहेत. याची अधिकृत नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये होणार आहे.

या मार्गाचे उद्घाटन उद्या होत असून, पहिल्या टप्प्यात (31 ऑक्टोबर 2026 पर्यंत) केवळ कार आणि बस यांसारख्या हलक्या वाहनांनाच प्रवेश दिला जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव अवजड ट्रकला सध्या बंदी असेल. विशेष म्हणजे, या हाय-टेक मार्गासाठी प्रवाशांना कोणताही अतिरिक्त टोल द्यावा लागणार नाही.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बोगद्याची रुंदी विक्रमी असून त्यातून 10 लेनची वाहतूक एकाच वेळी होऊ शकणार आहे. या ऐतिहासिक कामगिरीची पाहणी करण्यासाठी गिनीज बुकचे अधिकारी लवकरच भेट देणार आहेत. तसेच, जमिनीपासून 132 मीटर उंचीवर असलेला केबल-स्टेड ब्रीज या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण आहे.

SL/ ML/ SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *