ओव्हरटाइमसाठी कर्मचाऱ्यांना मिळणार दुप्पट मोबदला
मुंबई, दि. 21 : नवीन लेबर लॉ (New Labour Law) अंतर्गत सरकारने कर्मचाऱ्यांच्या बाजूने मोठा निर्णय घेतला आहे. आता कोणत्याही कर्मचाऱ्याने त्याच्या ठराविक वेळेपेक्षा जास्त काम केल्यास, कंपनीला त्याला ‘डबल वेज’ म्हणजेच सामान्य पगाराच्या दुप्पट दराने पैसे द्यावे लागणार आहेत.
कंपन्यांकडून होणारे कर्मचाऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी ओव्हरटाइम मोजण्याच्या पद्धतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. जर तुम्ही शिफ्टनंतर 15 ते 30 मिनिटे अतिरिक्त काम केले, तर तो 30 मिनिटांचा ओव्हरटाइम मानला जाईल. जर काम अर्ध्या तासापेक्षा जास्त असेल, तर तो पूर्ण 1 तासाचा ओव्हरटाइम मोजला जाईल.
ओव्हरटाइमचा हा दुप्पट मोबदला कर्मचाऱ्याच्या मूळ पगार (Basic Salary) + महागाई भत्ता (DA) यांच्या आधारावर मोजला जाईल. कोणतेही कारण सांगून कंपनी ओव्हरटाइमचे पैसे नाकारू शकणार नाही. तसे केल्यास कंपनीवर भारी दंड आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते.
SL/ML/SL