वाढत्या जागतिक तणावामुळे बाजारावर दबाव; पुढील आठवडा ठरणार निर्णायक
जितेश सावंत
भारतीय शेअर बाजाराने गेल्या आठवड्याचा शेवट घसरणीसह केला. अत्यंत चढउतार असलेल्या आठवड्यात बाजारात मोठ्या प्रमाणात नफावसुली वाढल्याचे दिसले. IT आणि बँकिंग क्षेत्रातील विक्री, कच्च्या तेलाचे वाढणारे दर, रुपयातील विक्रमी कमजोरी आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री (FII विक्री)यामुळे बाजारावर दबाव कायम राहिला आणि परिणामी गुंतवणूकदारानी नफा वसुली मार्ग स्वीकारला.
पुढील आठवड्यातही बाजार सावध भूमिकेत राहण्याची शक्यता दिसत आहे.
तिमाही निकाल, जागतिक आर्थिक संकेत आणि Nvidia च्या निकालांमुळे पुढील आठवडा बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या आठवड्यात NIFTY50 निर्देशांकात 2.2 टक्क्यांची घसरण झाली., तर SENSEX 2.7 टक्क्यांनी घसरला . विशेष म्हणजे घसरण केवळ मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित न राहता बाजारात व्यापक स्वरूपात दिसून आली. Small-cap 250 निर्देशांक 4.1 टक्के, तर Mid-cap 150 निर्देशांक 2.2 टक्क्यांनी खाली आला. आठवडाभरात IT क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली.
बाजार घसरण्याचे एक प्रमुख कारण ठरले ते म्हणजे रुपयातील कमजोरी. डॉलरच्या तुलनेत रुपया 96 च्या खाली पोहोचला असून तो गेल्या 12 महिन्यांतील सर्वात कमजोर स्तर मानला जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारने चार वर्षांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर ₹3 वाढ केल्याने महागाईची चिंता पुन्हा वाढली आहे. याचा परिणाम ग्राहक खर्च आणि कंपन्यांच्या नफ्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यामुळे देखील बाजारावरील दबाव वाढला.
पुढील आठवड्यात ‘या’ ट्रिगर्सवर बाजाराची नजर राहील
१८ मेपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात अनेक दिग्गज कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. ITC, LIC, Sun Pharma, IOC, BPCL, Grasim, Apollo Hospital, Colgate, RVNL आणि Nykaa यांसारख्या कंपन्यांच्या निकालांकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असेल.
Nvidia चे निकाल ठरणार महत्त्वाचे
जगातील सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Nvidia चे निकाल बुधवारी जाहीर होणार आहेत. AI आणि डेटा-सेंटर खर्चाविषयी कंपनीकडून मिळणारे संकेत जागतिक टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. निकाल अपेक्षेपेक्षा कमजोर आल्यास जागतिक बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते.
कच्च्या तेलाच्या किंमती,अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचे मिनिट्स, भारत आणि अमेरिकेचे PMI डेटा तसेच जपानचा GDP डेटा हे घटकही बाजाराच्या दिशेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
Technical Analysis of Nifty:
Closing on Friday: Nifty closed at 23643.5
KeySupportLevels 23580,23550,23468, 23346 and.23300 Breaking these could lead Nifty to further lower levels
Resistance Levels:23697,23739,23790,23898, 23950,23972,24014,and.24131These resistance levels are crucial for Nifty.
Indian stock markets ended last week on a weak note amid heavy volatility and profit booking. Selling pressure in IT and banking stocks, rising crude oil prices, weakness in the rupee, and continued FII selling kept the market under pressure. NIFTY50 fell 2.2% while SENSEX declined 2.7% during the week. Broader markets also witnessed weakness, with sharp declines in small-cap and mid-cap indices.
The rupee slipped below 96 against the US dollar, marking its weakest level in the last 12 months. Rising fuel prices and inflation concerns also impacted investor sentiment.
In the coming week, market participants will closely track quarterly earnings of major companies such as ITC, LIC, Sun Pharma, IOC, BPCL, Grasim, Apollo Hospital, Colgate, RVNL, and Nykaa. Nvidia’s earnings announcement on Wednesday will also remain a major global trigger, especially for AI and technology-related stocks.
Additionally, crude oil prices, US Federal Reserve meeting minutes, India and US PMI data, and Japan’s GDP data will play an important role in determining market direction.
लेखक शेअर बाजार, अर्थविषयक घडामोडी, सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्शन कायदा तज्ज्ञ आहेत.
The author is an expert in the stock market, financial affairs, cyber law, and data protection law.
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
ML/ML/MS