देवर्षि नारद पत्रकारिता सन्मान २०२६’ पुरस्कारांची घोषणा
मुंबई दि १ : यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार गणेश(भाऊ) तोरसेकर यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार श्रेणीत मिलिंद बल्लाळ (ठाणे वैभव), जितेंद्र दीक्षित (एनडिटीव्ही), डॉ. मयूर परिख आणि राकेश त्रिवेदी (टाइम्स नाऊ नवभारत) यांची आणि युवा पत्रकार श्रेणीत मनश्री पाठक (झी २४ तास) आणि सागर देवरे(मुंबई तरुण भारत) यांची निवड झाली आहे.
उत्कृष्ट वार्ताहर म्हणून गौरीशंकर घाळे (पुढारी) तर उत्कृष्ट लेखनासाठी संजीव भागवत (सकाळ) यांचा गौरव करण्यात येणार आहे. समाजमाध्यमांतील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल आकाश दांडेकर, माणिक रेगे (इंस्टाग्राम) आणि आकाश भावसार (यूट्यूब) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
ML/ML/SL