‘ना सायकल ट्रॅक ना उद्यान’
तरी देखभालीचा खर्च ७ कोटी!
स्थायी समितीत प्रशासनाला धरले धारेवर

 ‘ना सायकल ट्रॅक ना उद्यान’तरी देखभालीचा खर्च ७ कोटी!स्थायी समितीत प्रशासनाला धरले धारेवर

मुंबई, दि २३: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या शेजारी सायकल ट्रॅक आणि उद्यान विकसित करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असला, तरी प्रत्यक्षात या ठिकाणी ना सायकल ट्रॅक तयार झाले आहेत, ना उद्यानांची उभारणी झाली आहे. उलट अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले असताना देखभालीसाठी तब्बल ७ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याने स्थायी समितीत प्रशासनावर जोरदार टीका झाली.

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “जिथे प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नाही, तिथे देखभालीचा खर्च कसा?” असा सवाल उपस्थित करत प्रशासन दिशाभूल करत असल्याचा आरोप सदस्या दिपमाला बढे यांनी केला. सायकल ट्रॅकच्या नावाखाली नागरिकांना विस्थापित करण्यात आले, मात्र प्रत्यक्ष ट्रॅकच उभारला गेला नाही. त्यामुळे याबाबत सविस्तर अहवाल सादर करावा, अशी मागणी सदस्या राखी जाधव यांनी केली.
वाकोला पाईपलाईन परिसरात कारवाई करून नागरिकांची घरे हटवण्यात आली, आणि आता १८ किलोमीटरच्या पट्ट्यासाठी ७ कोटी रुपयांचा देखभालीचा प्रस्ताव आणला जात आहे, असा आरोप करत सदस्या ट्युलिप मिरांडा यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला.
“ना सायकल ट्रॅक, ना उद्यान मग देखभालीचा प्रस्ताव कशासाठी?” असा प्रश्न उपस्थित करत सदस्यांनी प्रशासनाला कोंडीत पकडले. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी संबंधित प्रस्ताव राखून ठेवण्याचा निर्णय घेतला.
या मुद्द्यावरून प्रशासनाच्या कामकाजाच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *