विरोध झुगारून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा २३ कोटींचा प्रस्ताव मंजूर!

 विरोध झुगारून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा २३ कोटींचा प्रस्ताव मंजूर!

मुंबई, दि २३: भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सादर करण्यात आलेल्या २३ कोटी रुपयांच्या निर्बीजीकरण प्रस्तावाला स्थायी समितीत जोरदार विरोध झाला. निवारा केंद्र उभारण्याची मागणी विरोधी सदस्यांनी आक्रमकपणे मांडली; मात्र प्रशासनाच्या स्पष्टीकरणानंतर समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रस्ताव मंजूर केला.

मुंबईत भटक्या कुत्र्यांकडून चाव्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार १९९८ पासून महापालिका अशासकीय संस्थांच्या माध्यमातून निर्बीजीकरणाची मोहीम राबवत आहे. तरीही समस्या कायम असल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. २०२४ च्या आकडेवारीनुसार शहरात सुमारे ९०,७५७ भटकी कुत्री असून त्यापैकी मोठ्या संख्येचे निर्बीजीकरण अद्याप झालेले नाही.
महापालिकेने तीन वर्षांसाठी ९ संस्थांना एकूण २३.३० कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कुत्र्यांना पकडून पुन्हा त्याच ठिकाणी सोडण्याच्या पद्धतीवर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवारा केंद्र उभारण्याचा पर्याय पुढे केला.
निवारा केंद्रासाठी जागेचा शोध सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली असून, या विषयावर सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.
…………
खर्च आणि कंत्राटे –
३ वर्षांसाठी एकूण खर्च : २३.३० कोटी रुपये
९ संस्थांना निर्बीजीकरणाचे कंत्राट
दरवर्षी हजारो कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे उद्दिष्ट
२०२२ च्या दरपत्रकानुसार खर्च निश्चित
………….
प्रमुख मुद्दे व मागण्या
निवारा केंद्र उभारण्याची सदस्यांची ठाम मागणी
भटक्या कुत्र्यांची संख्या : ९०,७५७ (२०२४ आकडेवारी)
चाव्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती
कुत्र्यांची संख्या मोजणी, लसीकरण व ओळख यावर प्रश्नचिन्ह. JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *