कर्नाटकात १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी
बंगळुरू, दि. ६ : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याचा १७ वा अर्थसंकल्प आज सादर केला. या दरम्यान त्यांनी १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर प्रतिबंध आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. लहान मुलाच्या स्क्रीन टाइम आणि सोशल मीडिया वापरावर तर चर्चा होतच असतात. परंतू यावर प्रतिबंध आणण्याचा देशातील पहिलाच निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे.
कर्नाटक विधिमंडळाच्या मागील अधिवेशनात राज्याचे आयटी मंत्री प्रियांक खरगे यांनी राज्य सरकार लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणण्यासंदर्भातील शक्यता तपासून पाहत असल्याचं म्हटलं होतं.
आंध्र प्रदेश सरकार आणि गोवा सरकार देखील लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा विचार करत आहेत. डिजीटल व्यसन, सायबर हल्ले आणि ऑनलाईन सुरक्षेला धोके अशी कारणं यासाठी दिली जात आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलियानं त्यांच्या देशात 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे.भारतातील विविध राज्य देखील लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा विचार करत आहेत. लहान मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी आणि स्क्रीन टाईम कमी व्हावा म्हणून अशा प्रकारची पावलं उचलली जात आहेत.
SL/ML/SL