छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 नगरसेवकांचे पद धोक्यात

 छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 नगरसेवकांचे पद धोक्यात

छत्रपती संभाजीनगर, दि. ५ :

शहरातील अतिक्रमण विरोधी मोहिमेत अडथळा आणल्याच्या कारणावरून MIM च्या 14 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया महानगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी या कारवाईबाबत अधिकृत दुजोरा दिला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत. मात्र, या निर्णयामुळे एमआयएम आक्रमक झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान एमआयएमच्या नगरसेवकांनी प्रशासकीय कामात अडथळा आणल्याचा आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी संबंधित 14 नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता याच गुन्ह्यांचा आधार घेत, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *