Month: February 2023

मराठवाडा

वुमन-२०परिषदेत ‘जन भागिदारी’ कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद

संभाजी नगर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथे जी-२० राष्ट्रसमूहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी विविध देशांच्या प्रतिनिधींच्या वुमन :२० परिषदेत २६ फेब्रुवारीला ‘ जन भागिदारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मिणी सभागृहात शहरातील महिला व युवतींसोबत ‘सक्षमीकरणाचा प्रवास’ या संकल्पनेवर संवाद साधला गेला. या वेळी पालक मंत्री संदीपान भुमरे, आ.हरिभाऊ बागडे, आ. प्रदीप जैस्वाल, वुमन […]Read More

Breaking News

विरोधी पक्षनेत्यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची आज विरोधी पक्षनेत्यांनी राजभभवन येथे जावून सदिच्छा भेट घेतली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतलेल्या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल परब, सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अनिल पाटील, कपिल पाटील, विनोद निकोले आदी […]Read More

महानगर

गेट वे ऑफ इंडिया येथे लाइट ॲण्ड साऊंड शो

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य शासनाचा पर्यटन विभाग, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि ब्रिटिश सैन्य दलाच्या भारतातील माघारीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवार २८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे लाइट ॲण्ड साऊंड शोचे आयेाजन करण्यात येणार […]Read More

Featured

शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा रायपूर अधिवेशनात काँग्रेसचा संकल्प.

रायपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपाची धोरणे शेतकरी विरोधी असून कृषी साहित्य, खते महाग झाली आहेत तर शेतमालाला हमी भाव मिळत नाही. शेती करणे परवडत नसल्याने शेतकरी आतमहत्या वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे शेतीची अवस्था दयनीय झाली असून देशातील अन्नदात्याला उद्ध्वस्त केले […]Read More

महाराष्ट्र

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थानी आदरांजली

नाशिक, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मारिता मारिता मरेतो झुंजेन म्हणत जुलमी सरकार विरुद्ध संपूर्ण जीवन भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये झोकून देणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण( पुण्यतिथी) दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील सावरकर स्मारकांमध्ये राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आदरांजली अर्पण केली. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते स्मारकातील सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण […]Read More

पर्यटन

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मगावी गार्डन थिम पार्क आणि संग्रहालय

नाशिक, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी. या निमित्त राज्यभरात स्वातंत्र्यवीरांचे स्वातंत्र्यलढ्यातील आणि साहित्यक्षेत्रातील योगदानाबाबत माहिती देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील भगुर हे सावरकराचे जन्मगाव. भगुर येथे महाराष्ट्र पर्यंटन विकास महामंडळाद्वारे त्यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणारे भव्य गार्डन थिम पार्क आणि सग्रंहालय यांची उभारणी करण्यात येणार आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

होळीच्या आधीच तापमानाचा पारा चढला

पुणे, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा नोव्हेंबर पर्यंत लांबलेल्या पावसानंतर संपूर्ण राज्यांतील नागरिकांना अनेक वर्षांनंतर थंडीचा कडाका अनुभवायला मिळाला. अगदी मुंबईकरांनीही यावर्षी थंडीचा आनंद लुटला. मात्र आता एकीकडे थंडी ओसरत असताना दुपारी तापमानाचा पारा वेगाने चढू लागला आहे.सर्वसाधारणपणे होळी नंतर तापमान वाढू लागते. मात्र यावर्षी होळीला अजून आठवडा शिल्लक असतानाच गेल्या काही दिवसांपासून […]Read More

महानगर

जे जे परिसरात बॉम्बस्फोटाची धमकी

मुंबई, दि.25( एमएमसी न्यूज नेटवर्क):मुंबईच्या जे.जे. रुग्णालय परिसरात बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याची मुंबई पोलिसांच्या दक्षिण नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून धमकी देणाऱ्या तरूणाला सर जे जे मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.अश्विन भारत महिसकर असे या तरुणाचे नाव असून तो नागपूरचा रहिवाशी असल्याचे तपासत पुढे आले आहे. या भागात बॉंबस्फोट घडवणार ! शुक्रवारी दक्षिण नियंत्रण कक्षात पोलीस उप […]Read More

ट्रेण्डिंग

ऑनलाईन फ्रॉड, वृद्ध दांपत्याने गमावले तब्बल ८ लाख

नोएडा,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंटरनेट बॅंकीगचा वापर जेवढा सोपा तेवढ त्याच्या वापराबाबत योग्य सावधगिरी न बाळगल्यास लुटले जाण्याच्या घटनाही समोर येतात. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जाते. नोएडातील एक ज्येष्ठ नागरिक जोडप्याला तब्बल ८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गुगल सर्चमध्ये केलेली एक चूक त्यांना चांगलीच महागात पडली […]Read More

राजकीय

सोनिया गांधींचे निवृत्तीचे संकेत

रायपूर,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्तीसगडमधील रायपूर येथील काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, आपल्या राजकारणातील निवृत्तीबाबत सुचक असे विधान केले आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यावरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयं सिंह यांनी भाष्य केले आहे. सोनिया गांधींनी केलेले वक्तव्य फक्त भारत जोडो यात्रेसंदर्भातच होते, […]Read More