काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना NSUI चेकेंद्रीय शिक्षणमंत्री यांच्या विरोधात जोरदार आंदोलन.

 काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना NSUI चेकेंद्रीय शिक्षणमंत्री यांच्या विरोधात जोरदार आंदोलन.

मुंबई, दि १४
NEET पेपर फुटी प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना NSUI ने आज मुंबई काँग्रेस कार्यालय परिसरात केंद्रीय शिक्षणमंत्री Dharmendra Pradhan यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप NSUI कार्यकर्त्यांनी केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *