लव्हलेन गणेशोत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि २८
माझगाव-भायखळा परिसरात मानवतेचा आदर्श घालून देणारे कार्य घडले. लव्हलेंन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि बाळासाहेब ठाकरे रुप्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत ११५ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
उन्हाळ्याच्या कठीण परिस्थितेतही लव्हलेंन व माझगाव विभागातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासाठी पुढाकार घेतला. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या उपक्रमाला यशस्वी केले.
या शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याने गरजूंना मदत करण्याचा एक मोठा संकल्प केला. रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे, या भावनेतून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. मिहिर मयेकर, सचिव श्री. अंकित लाड, कार्याध्यक्ष श्री. साईल मुरुडकर, खजिनदार श्री. मितेश तोरस्कार यांच्यासह सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
रक्तदान हे केवळ दान नसून, ते कोणाच्या तरी जीवनाची आशा असते. पुढेही असेच सामाजिक उपक्रम राबवण्याचा आमचा निर्धार असल्याची माहिती लव्हलेंन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष मिहिर मयेकर यांनी दिली.KK/ML/MS