लोणेरे तरुणी निर्घून ह्त्या प्रकरणी सकल मुस्लिम युवक संघटना आक्रमक
महाड, दि २३
लोणेरे येथे एका निष्पाप तरुणीवर झालेला अत्याचार व तिची निर्घृण हत्या ही अत्यंत भीषण, संतापजनक व मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण समाजात भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेचा सकल मुस्लिम युवक संघटनेकडून निषेध केला असून आरोपीला तात्काळ अटक व्हावी यासाठी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
या प्रकरणी सकल मुस्लिम युवक संघटनेचे महाड तालुका अध्यक्ष फैज हुर्जुक यांनी पोलिस निरीक्षक गोरेगांव यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की लोणेरे येथे एका निष्पाप तरुणीवर झालेला अत्याचार व तिची निर्घृण हत्या ही अत्यंत भीषण, संतापजनक व मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण समाजात भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सदर घटनेतील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी व त्यांच्या कृत्याची क्रूरता लक्षात घेता, या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने व युद्धपातळीवर करण्यात यावा. सर्व संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणात कोणतीही हलगर्जीपणा अथवा विलंब सहन केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी असे म्हटले आहे.
त्याच बरोबर पीडित कुटुंबास तातडीने न्याय मिळावा, यासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात याव्यात. अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात रोष निर्माण होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलणे अत्यावश्यक आहे.
सदरील घटनेचा तिव्र शब्दात निषेध करून तातडीने दखल घेऊन कार्यवाहीची मागणी सकल युवक संघटने महाराष्ट्रचे महाड तालुका अध्यक्ष फैज उमर हुर्जूक यांनी केली आहे.JS/ML/MS