पाकमध्ये आता चौक आणि नगरांना पुन्हा हिंदू नावं
लाहोर, दि. १९ : पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील लाहोर शहरात पुन्हा एकदा चौक, रस्ते आणि वसाहतींना त्यांच्या मूळ हिंदू, शीख व वसाहतकालीन नावांनी ओळख दिली जात आहे. हा निर्णय ‘लाहोर हेरिटेज एरिया रिव्हायवल प्रोजेक्ट’ अंतर्गत घेण्यात आला असून, यामुळे शहराच्या बहुसांस्कृतिक इतिहासाला पुन्हा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानच्या पंजाब सरकारने मे 2026 मध्ये कॅबिनेट बैठकीत मंजुरी देऊन लाहोरमधील अनेक रस्ते व चौकांना त्यांच्या पूर्व-फाळणीतील नावांनी पुन्हा ओळख देण्याचा निर्णय घेतला.
या प्रकल्पाचे नेतृत्व माजी पंतप्रधान नवाज शरीफ करत असून, सध्याच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी याला पुढे नेले आहे. अनेक रहिवासी सांगतात की जुनी नावे लोकांच्या स्मृतीतून कधीच नाहीशी झाली नव्हती, फक्त अधिकृत नोंदींमध्ये बदल झाला होता. या निर्णयामुळे लाहोरच्या बहुधर्मी व बहुसांस्कृतिक वारशाला मान्यता मिळत आहे. सरकारने याला युरोपियन देशांच्या वारसा संवर्धनाशी तुलना केली असून, ऐतिहासिक ओळख जपणे हेच उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे.
उद्दिष्ट: लाहोरच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीचे पुनरुज्जीवन करणे, तसेच वारसा पर्यटनाला चालना देणे.
पुनर्स्थापित नावे
इस्लामपुरा → कृष्ण नगर
बाबरी मशिद चौक → जैन मंदिर चौक
रेहमान गली → राम गली
सुन्नत नगर → संत नगर
मौलाना झफर अली खान चौक → लक्ष्मी चौक
मुस्तफाबाद → धरमपुरा
फातिमा जिना रोड → क्वीनस् रोड
सर आगा खान रोड → डेव्हिस रोड
बाग-ए-जिन्ना → लॉरेन्स गार्डन्स
SL/ML/SL