IMDb वर नंबर 1 ठरली ही वेब सीरिज
मुंबई, दि. १५ : नुकताच प्रदर्शित झालेला TVFच्या ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’ च्या दुसऱ्या भागाने IMDb च्या लोकप्रिय भारतीय टीव्ही शोजच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’ने IMDb च्या रेटिंगमध्ये प्राइम व्हिडीओच्या लोकप्रिय ‘पंचायत’ या वेब सीरिजलाही मागे टाकलं आहे. ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’ने IMDbच्या लोकप्रिय भारतीय टीव्ही शोजच्या यादीत पहिला क्रमांक मिळवल्यानंतर निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘यावेळी ड्रीमर्सने (स्वप्न पाहणाऱ्यांनी) खऱ्या अर्थाने मनं जिंकली आहेत. सपने व्हर्सेस एव्हरीवन पाहिल्याबद्दल, शेअर केल्याबद्दल आणि त्यातील प्रत्येक भावना अनुभवल्याबद्दल धन्यवाद. हे प्रेम आमच्यासाठी सर्वस्व आहे.’
IMDb च्या टॉप 250 टीव्ही शोजच्या यादीत स्थान मिळवलेल्या टीव्हीएफच्या इतर सीरिजमध्ये TVF पिचर्स (9.1 रेटिंग), पंचायत (9.0 रेटिंग), गुल्लक (9.1 रेटिंग), कोटा फॅक्ट्री (9.0 रेटिंग), एस्पिरंट्स (9.1 रेटिंग), ये मेरी फॅमिली (8.9 रेटिंग) यांचा समावेश आहे.