सततच्या मोबाईल वापरातून तंत्रशुद्ध शैक्षणिक संस्कृती लोप पावत चाललीय!राजेश्री शिरवडकर

 सततच्या मोबाईल वापरातून तंत्रशुद्ध शैक्षणिक संस्कृती लोप पावत चाललीय!राजेश्री शिरवडकर

मुंबई, दि १५
नव्या पिढीला शिक्षणात अत्याधुनिकतेची जोड देऊन बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करावीच लागेल .परंतु सततच्या मोबाईलवरील ट्वीटर,इंस्ट्राग्राम,व्हॉट्सॲपच्या वापरातून ही कुशल संस्कृती लोप पावणार की काय,अशी चिंता मुंबई महानगर पालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी येथे विद्यार्थ्यांच्या गुणगौरव‌ सोहळ्यात बोलतांना व्यक्त केली.
शंभरीच्या उंबरठ्यावरील परळमधील सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर ठरलेल्या आझाद हिंद सर्वोत्कर्ष मंडळाच्या वतीने शिक्षणात विशेष नैपुण्या सिद्ध करणा-या विद्यार्थ्यांचा नगरसेविका शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.परळ मधील लालओटा मैदानावर पार पडलेल्या विद्यार्थ्याच्या गुणगौरव सोहळ्याला राजश्री शिरवडकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. समारंभाला स्थानिक आमदार अजय चौधरी प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल, सामाजिक कार्यकर्ते महेश पेडणेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.प्रारंभी मंडळाचे प्रमुख कार्यवाह विजय परदेशी यांनी प्रास्ताविक केले.
राजश्री शिरवडकर यांनी आपल्या भाषणात,आझाद हिंद सर्वोत्कर्ष मंडळाने विभागातील हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्तेजन देण्यासाठी सुरू केलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याची प्रशंसा करून त्या म्हणाल्या,केवळ डॉक्टर, इंजिनिअर होऊनच नव्हे तर मैदानी खेळातूनही बुद्धिमत्ता विकसित करता येऊ शकते.त्पासाठी पालकानीही मुलांच्या भावना, इच्छा शक्तींचा आदर करावयास हवा.महा नगरपालिका मुंबईत अनेक ठिकाणी शाळांच्या पुनर्विकासाच्या योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही राजश्री शिरवडकर आपल्या भाषणात म्हणाल्या.
स्थानिक आमदार अजय चौधरी म्हणाले,मुंबईत ज्या भूखंडांवर महापालिकेच्या जुन्या शाळा आहेत, त्यांचा पुनर्विकास करण्याची मागणी आपण लावून धरली आहे.बालवाडी शिक्षण पध्दती आझाद हिंद सर्वोत्कर्ष मंडळाने मुंबईत परळगावात प्रथम सुरू केली,विभागात वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठीही सुसज्ज वाचनालय उभे केले,याचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो,असेही आमदार अजय चौधरी आपल्या भाषणात म्हणाले
कथालेखक काशिनाथ माटल म्हणाले,शिक्षणाला कोणतीही अनुकूल परिस्थिती नसतानाही गिरणगावातील मुले १० वी १२ वीत उच्च गुणाने उत्तीर्ण होऊन,या विद्यार्थ्यांनी आजच्या विद्यार्थीवर्गापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे,ही स्वागतार्ह गोष्ट आहे!सचिव शंकर शिगवण,पद्मनाभ परळकर,देवेंद्र सावंत हे‌ पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
या प्रसंगी शाल,पुस्तक आणि पारितोषिकाने गुणी‌ विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.रचित पांचाळ या सहा वर्षांच्या विद्यार्थ्यांने अलिकडेच पार पडलेल्या मुंबई श्री शरिरसौष्ठव स्पर्धेत प्रौढ गटात भाग घेण्याचे धाडस केले,त्या बद्दल त्याचा पाहूण्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *