अष्टविनायकातील 3 मंदिरं महिनाभर राहणार बंद

पुणे, दि. ८ :अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामांसाठी 3 मंदिरं बंद ठेवण्यात येणार आहेत. यात मोरगावचे श्री मयुरेश्वर, थेऊरचे श्री चिंतामणी आणि सिद्धटेकचे श्री सिद्धिविनायक मंदिराचा समावेश आहे. ही मंदिर 10 मे ते 9 जून 2026 या कालावधीत भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत. पुरातत्त्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंदिराचे मूळ पौराणिक स्वरूप जपण्यासाठी गाभारा आणि सभामंडपाचे विशेष दगडी काम केले जाणार आहे. त्यामुले याकाळात मंदिरात दर्शन होवू शकणार नाही.शासनाकडून मिळालेल्या विशेष निधीतून या मंदिरांची दुरुस्ती केली जात आहे. कामाचा वेग वाढवण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिरे बंद ठेवण्याचा प्रस्ताव सह धर्मादाय आयुक्तांनी मंजूर केला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टनेही या निर्णयाला पाठिंबा दिला असून तसा ठराव मंजूर केला आहे. पुरातत्त्व विभागाच्या नियोजनानुसार मंदिरांचा मुख्य गाभारा आणि सभामंडप यांचे पौराणिक स्वरूप जपत सुबक दगडी बांधकामाद्वारे संवर्धन करण्यात येणार आहे. या कामादरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती कामात अडथळा निर्माण करू शकते. तसेच कामाचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *