CAG कडून 101 शहरांचे होणार Ease of living ऑडीट

 CAG कडून 101 शहरांचे होणार Ease of living ऑडीट

नवी दिल्ली, दि.‌८ : देशातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना CAG कडून देशातील निवडक १०१ शहरांचे Ease of Living Audit केले जाणार आहे.

CAG चे के. संजय मूर्ती यांनी गुरुवारी येथे आयोजित ५ व्या ‘ब्रिक्स’ सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांच्या शिखर परिषदेत ही माहिती दिली. शहरांमधील जीवनमान, सुविधांची उपलब्धता, शाश्वतता, नागरिकांच्या यासंदर्भातील धारणा अशा निकषांवर हे ऑडिट केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताच्या ‘ब्रिक्स’ अध्यक्षपदाच्या काळात आयोजित या तीन दिवसीय परिषदेचा मुख्य विषय ‘नागरी गतिशीलता आणि जीवनमान सुलभता’ हा आहे.यावेळी मूर्ती म्हणाले की, भारतीय शहरे देशाच्या जमिनीच्या केवळ ३ टक्के भाग व्यापतात, मात्र देशाच्या एकूण जीडीपीमध्ये त्यांचा वाटा ६० टक्के आहे. २०३० पर्यंत भारतातील ७० टक्के नवीन नोकऱ्या शहरांमध्ये निर्माण होतील. अशा परिस्थितीत नागरी गतिशीलता हा प्रशासनाचा महत्त्वाचा भाग असून, तो नागरिकांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *