दक्षिण मुंबईतील जुन्या इमारतीच्या पुनर्विकासबाबत खासदार अरविंद सावंत यांनी घेतली म्हाडा अधिकाऱ्यांची भेट

 दक्षिण मुंबईतील जुन्या इमारतीच्या पुनर्विकासबाबत खासदार अरविंद सावंत यांनी घेतली म्हाडा अधिकाऱ्यांची भेट

मुंबई, दि ८
म्हाडा दक्षिण मुंबई तसेच मुंबई उपनगरातील रहिवाशांना भेडसावणार्‍या पुनर्विकासाच्या विविध प्रश्नावर खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळासह म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची बांद्रा येथील म्हाडा मुख्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत दक्षिण मुंबईमधील मेट्रो प्रकल्पामुळे अपात्र ठरलेल्या 13 रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आणि पात्रतेचा प्रश्न तसेच दक्षिण मुंबई आणि उपनगरातील विविध पुनर्विकास प्रकल्पाबाबतही चर्चा करण्यात आली. यामध्ये जगन्नाथ चाळ (फणसवाडी झावबावाडी) बाळगोविंद चाळ (ग्रॅण्ट रोड), गिरगाव येथील पुंभारवाडा, भंडारा स्ट्रीट परिसरातील 13 इमारती, मेट्रो – 3 प्रकल्पामुळे गिरगावातील बाधित रहिवाशांचे प्रश्न आणि चारकोप येथील सत्संग सोसायटी या म्हाडा सोसायटय़ांमधील नागरिकांच्या पुनर्विकासासंदर्भातील समस्यांचा समावेश होता.
रहिवाशांच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्या अडचणींचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन या बैठकीत म्हाडा उपाध्यक्षांनी दिले. दक्षिण मुंबईतील इमारतीत राहणाऱ्या अनेक नागरिकांना पुनविकासाच्या विविध समस्या भेडसावत असून त्यांना न्याय देणे हे आमचे परम कर्तव्य आहे. त्यानुसारच आम्ही म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत भेट घेऊन त्यांचे समस्या सोडवण्यासाठी पत्र दिले यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली.
यावेळी विभागप्रमुख संतोष शिंदे, भाडेकरू संघाचे मुकेश शाह पेंडसे, शाखाप्रमुख बाळा अहिरेकर, वैभव मयेकर तसेच शिवसैनिक तसेच नागरिक उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *