UAE पडला OPEC मधून बाहेर

 UAE पडला OPEC मधून बाहेर

अबुधाबी, दि. ४ : संयुक्त अरब अमिरातीने (UAE) खनिज तेल उत्पादक देशांची बलाढ्य संघटना असलेल्या ‘ओपेक’ (OPEC) आणि ‘ओपेक प्लस’मधून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. युएई आता स्वतंत्रपणे तेलाचे उत्पादन आणि वितरण करणार आहे. UAE 1967 पासून ओपेकचा सक्रिय सदस्य होता. मात्र, गेल्या काही काळापासून युएई आणि सौदी अरेबिया यांच्यात तेल उत्पादनाच्या मर्यादेवरून मतभेद होते. युएईकडे तेल काढण्याची प्रचंड क्षमता आहे आणि त्यांना आपले उत्पादन वाढवून अधिक नफा कमवायचा आहे. परंतु, ओपेकच्या नियमांमुळे युएईवर उत्पादनावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. आपली आर्थिक प्रगती वेगाने करण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यासाठी युएईने हा धाडसी निर्णय घेतल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

भारत आपल्या गरजेच्या 80 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो. जर UAE ने ओपेकच्या बंधनांशिवाय मोठ्या प्रमाणावर तेल उत्पादन सुरू केले, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊ शकतात. याचा थेट फायदा भारतीय ग्राहकांना स्वस्त पेट्रोल आणि डिझेलच्या रूपात मिळू शकतो.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *