धडक वूमन एम्पॉवर असोसिएशनकडून ‘डीडबल्यूईए एक्सलन्स अवॉर्ड्स’ ने ३० महिलांचा सन्मान

 धडक वूमन एम्पॉवर असोसिएशनकडून ‘डीडबल्यूईए एक्सलन्स अवॉर्ड्स’ ने ३० महिलांचा सन्मान

मुंबई, दि ४: महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत कार्यरत धडक वूमन एम्पॉवर असोसिएशन च्या वतीने आयोजित भव्य कामगार मेळाव्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३० महिलांना ‘डीडबल्यूईए एक्सलन्स अवॉर्ड्स’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे मार्गदर्शन प्रख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी केले.

या कार्यक्रमात शिखा नायर (वॉटर मॅनेजमेंट), अर्चना भांडारकर (मेनोपॉज कोच), प्रियांका पांड्या (लाईफ कोच), कल्पिता नायडू (वेलनेस प्रॉडक्ट्स अँड हीलिंग सर्व्हिसेस), डॉ. प्रणोती कुकाडिया (योगा थेरपिस्ट), प्रिती मेहता (डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट), मीता झुंझुनवाला (इंटिमसी अँड होलिस्टिक हेल्थ कोच), डॉ. पूजा (अकॅडेमिशियन व मेंटर कोच), डॉ. राधिका अग्रवाल (डेंटिस्ट/स्किन/हेअर कॉस्मेटोलॉजिस्ट), भाविनी शेटिया (नॅचुरोपॅथ व योगा इन्स्ट्रक्टर), जेन गिलियन रॉड्रिग्ज (हियरिंग एड सेंटर्स व होमस्टेज), कुंतल चेतन सोनपाल (प्राणिक हीलर व ट्रेनर), मधुलीका अरोरा (फ्लोरल डिझायनर), कीर्ती गुप्ता (ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग), गायत्री जोशी (ब्युटी अँड वेलनेस कोच), संगीता अग्रवाल (संस्थापक – अग्रिम अग्रवाल फाउंडेशन, मेंटल हेल्थ अँड डी-अॅडिक्शन), कल्पना मितल मंगल (फ्लोरल डिझायनर व इव्हेंट डेकोरेटर), अॅड. प्रेमलता जैन (प्रॉपर्टी लॉयर), डॉ. सायली कुलकर्णी (हायजिन एक्स्पर्ट), प्रियांका टोपले (सिल्व्हर ज्वेलरी रिटेलर), मृणोती पुजारी (अल्केमिस्ट, गौकला), सचिन बांगेरा (पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट व रेकी ग्रँड मास्टर), रमेश वांजा (इंटेरिअर वर्क), मानव गुप्ता (फायनान्शियल अॅडव्हायझर), नरेश पंजनानी (लाईफ, हेल्थ अँड डिसॅबिलिटी इन्शुरन्स), डॉ. प्रवीण के. दिवाकर (नॅचुरोपॅथ), मोहित बांगरे (पेस्ट कंट्रोल व हायजिन प्रॉडक्ट्स), प्रग्नेश सद्राणी (म्युच्युअल फंड व इन्शुरन्स), ममता शर्मा (फेमीफोर्स होम केअर सर्व्हिस), मधु मेहता (अॅस्ट्रोलॉजर व न्यूमरोलॉजिस्ट) यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी कामगार नेते अभिजीत राणे म्हणाले, “समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करणे ही केवळ औपचारिकता नसून, त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्याची जबाबदारी आहे. DWEA च्या माध्यमातून अशा प्रेरणादायी महिलांना व्यासपीठ देत आहोत, ही अभिमानाची बाब आहे.”
कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या धडक वूमन एम्पॉवर असोसिएशनच्या युनिट अध्यक्ष चैताली चॅटर्जी यांनी सर्व मान्यवर, पुरस्कार विजेत्या महिला व उपस्थितांचे आभार मानत, “या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमच्या प्रयत्नांना अधिक बळ देणारा आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला,” असे सांगितले.

हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला असून, महिलांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण करणारा ठरला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर, भाजपा ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह, गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर, भाजपा नेते जयप्रकाश ठाकूर, भाजपा मुंबई सरचिटणीस विनोद शेलार, भाजपा मुंबई सचिव अखिलेश चौबे आदी मान्यवर उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *