‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये या मराठी अभिनेत्रीची निवड

 ‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये या मराठी अभिनेत्रीची निवड

कन्टेंट क्रिएटर श्वेता साकोडे ‘ मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया ‘ या रिअॅलिटी कार्यक्रमातील सहभागामुळे ती अलीकडे चर्चेत आहे. मुळची नागपूरची असलेली श्वेता लग्नानंतर २०१३ साली ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक झाली. ती दातांची डॉक्टर असून आता सध्या क्लिनिकल रिसर्च करते. विविध आजारांवरील औषधांचा शोध घेऊन त्यासाठी औषधं तयार करून त्याच्या ट्रायल घेण्याचं काम ती करते. हे सगळं सांभाळून ती २०२०पासून कन्टेंट क्रिएशन करू लागली.

या कार्यक्रमात श्वेता अंतिम ४० स्पर्धकांपर्यंत पोहोचली आहे. पाककलेला पुढच्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी तिनं आवश्यक असलेली यंत्रं मागवली असून आता ती कोणकोणत्या रुचकर पदार्थांची चव चाखवते याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

श्वेता म्हणाली,

“‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये सहभागी होणं हे मी स्वतःलाच दिलेलं आव्हान होतं. हा प्रवास म्हणजे त्यागाची परीक्षा होती. पण यानिमित्तानं आपल्या मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीचा डंका जगभर वाजला, याचा आनंद आहे.”

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *