रायगड जिल्हा पर्यावरण समिती वर श्री राजेंद्र सामाजिक विकास संस्था नाते यांची नियुक्ती
महाड, दि १५- रायगड जिल्ह्यातील पर्यावरण दृष्टीने अतीसंवेदनशील असलेल्या गावात शाश्वत उपजीविका आणि पर्यावरण संवर्धन करणारे श्री राजेंद्र सामाजिक विकास संस्था नाते या संस्थेची रायगड जिल्हा पर्यावरण समिती वर नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने सन 1988 मध्ये दिलेल्या निर्देशातील सूचनांनुसार समितीची कार्यकक्षा ठरविण्यात आली होती. सन 1988 नंतर पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करणे व त्यासाठी आवश्यक तज्ञ मनुष्यबळ या व अनुषंगिक बार्बीचा विचार करता कालानुरुप जिल्हा समितीच्या कार्यकक्षांमध्ये बदल करणे आवश्यक झाले आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीयदृष्ट्या सोयीस्कर व्हावे यासाठी नव्याने जिल्हा पर्यावरण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन शासन निर्णय क्र. जिपस-२०१४/प्र.क्र.९५/तां.क.३, दिनांक २५/११/२०२५ मधील तरतुदीनुसार, रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, पर्यावरणीय समस्यांचे निवारण आणि जनजागृती करण्यासाठी ‘रायगड जिल्हा पर्यावरण समिती’ पुनर्गठित करण्यात आली आहे.
जिल्हा पर्यावरण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून
जिल्हाधिकारी, रायगड काम करीत असून
कु. अदिती वरदा सुनिल तटकरे, मा. मंत्री, महिला व बालकविकास महाराष्ट्र राज्य, श्री. भरत विठाबाई मारुती गोगावले, मा. मंत्री रोजगार हमी योजना, सदस्य फलोत्पादन, खारभुमी विकास महाराष्ट्र राज्य,
श्री. धर्यशील पाटील मा राज्यसभा खासदार श्री श्रीरंग बारणे, मा. लोकसभा खासदार
श्रो. सुनिल तटकरे, मा. लोकसभा खासदार यांचे सह जिल्ह्यातील सर्व विद्यमान आमदार आणि सर्व शासकीय विभागाचे विभाग प्रमुख हे सदस्य आहेत
पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणारे डॉ सचिन पोरे, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख, डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्य तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे आणि श्री महेश चव्हाण हे रायगड जिल्ह्यातील पर्यावरण तज्ञ सदस्य असणार आहेत.
स्वदेस फाऊंडेशन लोणेरे आणि श्री राजेंद्र सामाजिक विकास संस्था नाते महाड या पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्थांना या समिती मध्ये स्थान देण्यात आले आहे.
सावित्री नदी खोऱ्यात जल आणि जंगल संवर्धन करण्यासाठी हिरवळ प्रतिष्ठान आणि सिस्केप या संस्थेचे सोबत श्री राजेंद्र सामाजिक विकास संस्था काम करीत असून, गोखले राज्य शास्त्र आणि अर्थ शास्त्र संस्था पुणे यांचे सहकार्याने पर्यावरण दृष्टीने अतीसंवेदनशील असलेल्या गावातील शेतकरी बंधु भगिनी यांच्या शाश्वत उपजीविका आणि मानव वन्य जीव संघर्ष रोखण्यासाठी नाते येथे शाश्वत विकास केंद्र चालवित आहे.
डॉ सुधीर पटवर्धन बिरवाडी यांचे नंतर फार वर्षांनी महाड तालुक्यातील एका संस्थेला पर्यावरण समिती मध्ये काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा प्रमोद खातू यांनी नामदार भरत शेट गोगावले आणि डॉ किसन जावळे साहेब जिल्हाधिकारी रायगड यांचे आभार मानले आहेत. JS/ML/MS