सी आणि डी प्रभाग समितीअध्यक्षपदी आकाश पुरोहितयांची बिनविरोध निवड

 सी आणि डी प्रभाग समितीअध्यक्षपदी आकाश पुरोहितयांची बिनविरोध निवड

मुंबई, दि ५
‘सी’ आणि ‘डी’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. आकाश राज पुरोहित यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी म्हणून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी कामकाज सांभाळले. उप आयुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव आणि महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे यावेळी उपस्थित होत्या.

‘आर मध्‍य’ आणि ‘आर उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे श्री. प्रकाश यशवंत दरेकर यांची आज बिनविरोध निवड झाली.

पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर श्री. संजय घाडी यांनी कामकाज पाहिले.

उप आयुक्त (परिमंडळ-७) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त श्री. नयनीश वेंगुर्लेकर , महानगरपालिका उपसचिव श्री. प्रमोद गिरी उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *