विक्रोळी येथे प्रकल्प निरामया यांच्यावतीने
आरोग्य शिबिर संपन्न.

 विक्रोळी येथे प्रकल्प निरामया यांच्यावतीनेआरोग्य शिबिर संपन्न.

मुंबई : 2 – हुमाना पीपल टू पीपल इंडिया आणि मर्क स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या प्रकल्प निरामया मार्फत विक्रोळी इस्ट येथील कन्नमवार नगर २, दाजी वाडा येथे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी या शिबिरात गर्भाशयाच्या मुखाची तपासणी, स्तन तपासणी, व रक्तदाब तपासणी मधुमेह अशा विविध चाचण्या करण्यात आल्या. यावेळी महिला व किशोरवयीन मुलींनी मोठ्या प्रमाणात सदर शिबिरात भाग घेऊन आपली उपस्थिती नोंदवली. प्रकल्प निरामयामार्फत विक्रोळी पूर्व येथे आरोग्य
विषयक जनजागृती, महिला व किशोरवयीन मुलींसाठी दर महिन्याला आरोग्य प्रशिक्षण आणि किशोरवयीन मुलींसाठी मोफत सेनेटरी पॅडचे वाटप करण्याच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते.
या आरोग्य शिबिराचा लाभ विभागातील असंख्य महिलांनी घेतला. या शिबिरात गर्भाशयाच्या मुखाची तपासणी, स्तन तपासणी, मधुमेह व रक्तदाब तपासणी, अशा विविध चाचण्या करण्यात आल्या. या उपक्रमात
डॉ. तृप्ती पोयेकर,
डॉ.हुमेरा सिद्दिकी,
डॉ. निधी अग्रवाल,
डॉ.योजना, एचपीपीआय स्टाफ हेल्थ एक्सलेटर सुनंदा पाटील, श्रीदेवी ठाणेकर, प्रोजेक्ट मॅनेजर दीपक महातो, कम्युनिटी मोबिलायझर गीता डावरे सुषमा जयस्वाल,एम आय एस ऑफिसर अर्णव गागुली आदींनी सेवा दिली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *