वेद-उपनिषदांतील श्रीगणेश : वर्तमान अन्वयार्थ: हेमंत राजोपाध्ये -भाषा, इतिहास, संस्कृती अभ्यासक
हेमंत राजोपाध्ये – भारतीय भाषा, इतिहास आणि संस्कृतीचे अभ्यासक
श्रीगणेश ही सर्वांनाच प्रिय अशी पुरातन देवता आहे.ब्राह्मणस्पती, गणांचा अधिपती,व्रातपती अशा विविध रूपातील त्याचे वर्णन वैदिक आणि पौराणिक वाङमयामध्ये अभिव्यक्त झालेले आहे. देवता उन्नयन शास्त्रानुसार गणेशाचे निर्गुण निराकारातून सगुण साकार रूप कसे विकसित होत गेले,, त्यानंतर आढळणारे ऐतिसासिक संदर्भ आपण या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. गणेशाचे ओमकार स्वरूप प्राचीन काळात केली जाणारी गणेश उपासना, गाणपत्य संप्रदाय आणि वर्तमानकाळातील सार्वजनीक गणेशोत्सवाचे स्वरूप या विषयीही प्रा. हेमंत राजोपाध्ये यांनी मौलिक माहिती देऊन भाष्य केले आहे.
नव्या जुन्याची सांगड घालत, त्याचे वर्तमानकाळातील मोल जाणून घेऊन ही शास्त्रशुद्ध माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न MMC News नेटवर्क सातत्याने करत आहे.
या गणेशोत्सवाच्या निमित्ताने MMC News Network च्या वर्तमानमध्ये आपण वेद-उपनिषदांतील श्रीगणेश आणि वर्तमान अन्वयार्थ -या विषयाच्या द्वारे : भारतीय भाषा, इतिहास आणि संस्कृतीचे अभ्यासक हेमंत राजोपाध्ये यांच्याकडून गणेशाचे रूप, त्यांची अभिव्यक्ती आणि आत्ताच्या काळात या देवतेच्या उपासनेतून आपण घ्यावे याचे तात्विक विवेचन जाणून घेतले आहे. हा गणेशोत्सव विशेष भाग अवश्य पाहा.
अधिकाधीक लोकांपर्यंत हा एपिसोड शेअर करा. तुमच्या कमेंट जाणून घ्यायलाही आम्हाला आवडतील. असेच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MMC News नेटवर्कला सबस्क्राईब करा.