#कोरोना लसीकरणानंतरचा मृत्यु हृदयविकाराच्या धक्क्यामुळे

मुरादाबाद, दि.18(एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्तरप्रदेश येथील मुरादाबाद येथे कोरोना लस घेतल्यानंतर वॉर्डबॉयचा मृत्यु झाल्याप्रकरणी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांनी हा मृत्यु हृदयविकाराच्या धक्क्यामुळे झाला असल्याचे सांगितले आहे. मुरादाबाद जिल्हा रुग्णालयात तैनात असलेले 48 वर्षीय वॉर्ड बॉय महिपाल सिंग यांनी लस घेतल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले परंतू त्यांचे प्राण वाचू शकले नव्हते.
16 जानेवारीला महिपाल सिंग यांनी लस घेतली होती. रविवारी सायंकाळी त्यांची प्रकृती बिघडली. महिपाल यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतू त्याठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांनी रविवारी सांगितले होते की लसीकरणाची प्रतिक्रिया झाल्याचे दिसत नाही, त्यांच्या मृत्युच्या कारणांची तपासणी सुरु आहे. त्यांनी सांगितले महिपाल आधी कोरोना संक्रमित नव्हते.
मृत्यु झालेले महिपाल यांचा मुलगा विशाल याने सांगितले की 16 जानेवारीला त्यांच्या वडिलांनी त्यांना घेऊन रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले कारण त्यांना कोरोना लस देण्यात येणार होती. विशाल याने सांगितले की 16 जानेवारीला लस घेतल्यानंतर तो वडिलांना परत घेऊन आला. त्यांना धाप लागत होती आणि ते खोकत होते. विशाल ने सांगितले की ते कोरोना पॉजिटिव्ह नव्हते, मात्र त्यांना न्युमोनिया होता. रुग्णालयातून आल्यानंतर त्यांचा त्रास वाढला होता.
रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी एम सी गर्ग यांनी रविवारी सांगितले होते की शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्युचे कारण स्पष्ट होईल. आज मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांचा मृत्यु हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे सांगितले. याप्रकरणी रुग्णालय प्रशासन आणखी चौकशी करत आहे.

Tag-uttar-pradesh/corona-vaccination/death/heart-attack
PL/KA/PL/18 JAN 2021