सोयाबीनच्या पट्ट्यात हळद लागवडीस सुरुवात …

 सोयाबीनच्या पट्ट्यात हळद लागवडीस सुरुवात …

वाशिम, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोयाबीन बेल्ट म्हणून ओळख असलेल्या वाशीम जिल्ह्यातील शेतकरी मागील दोन वर्षा पासून काही प्रमाणात हळद पिकाकडे वळला आहे. इतर पिकांच्या तुलनेत समाधानकारक नफा मिळवून देणाऱ्या या मसालावर्गीय पिकाच्या मान्सूनपूर्व लागवडीस जिल्ह्यात सुरुवात झाली आहे.खरिपातील इतर पेरणीची व हळद लागवडीची एकच घाई होऊ नये म्हणून आधी हळद लागवड करण्यात येत आहे. Turmeric cultivation

कपाशी नंतर पश्चिम विदर्भात प्रामुख्याने सोयाबीनचे उत्पादन घेण्यात येते. After cotton, soybean is mainly grown in West Vidarbha. वाशीम जिल्ह्याला लागून असलेल्या मराठवाड्यातील परभणी,हिंगोली जिल्ह्यात मोठया प्रमाणात हळदीची शेती करण्यात येते.येथील शेतकऱ्यांना या पिकापासून बऱ्यापैकी नफा मिळत असल्याने वाशीम जिल्ह्यातील शेतकऱयांनी मागील 2 वर्षा पासून हळदीचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे.

हळद पिकाची लागवड केल्या नंतर उगवण होण्यास 21 दिवसा पासून एक महिन्याचा कालावधी लागतो,राज्यात मान्सून सक्रिय झाला असून खरिपातील इतर पिकांच्या पेरणीची व हळद लागवडीची एकच घाई होऊ नये या करिता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हळद लागवडीस सुरुवात केली आहे.

खरिपातील सोयाबीन,उडीद, मूग,कपाशी या पिकांच्या तुलनेत हळद पिका पासून समाधानकारक नफा मिळत असल्याने जिल्ह्यातील बरेच शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. शेजारी असलेल्या हिंगोली,वसमत येथे हळदीची मोठी बाजारपेठ असल्याने चांगला बाजारभावही मिळत आहे.

ML/KA/PGB

14 Jun 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *