चिपीसाठी एअर इंडियाच्या वेबसाईटवर तिकिट बुकींग सुरु

चिपीसाठी एअर इंडियाच्या वेबसाईटवर तिकिट बुकींग सुरु

सिंधुदुर्ग, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :परुळे चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून नऊ ऑक्टोबर पासून रोज विमान प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे. Daily flight service will be started from Sindhudurg Airport at Parule Chipi from October 9. रोज मुंबई सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई असे एक अलायन्स एअर म्हणजे एअर इंडियाचे 70 आसनी विमान असेल. अशी माहिती आलायन्स एअर सिंधुदुर्ग स्टेशन मॅनेजर समीर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. Sameer Kulkarni gave the information in a press conference. गुरुवार पासून www.airindia.in या एअर इंडियाच्या वेबसाईटवर बुकिंग सुरू होईल तर एक ऑक्टोबरपासून चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरील काऊंटरवर बुकिंग सुरू होईल असे कुलकर्णी यांनी सांगितले.Booking will start at the counter at Sindhudurg Airport, Kulkarni said.

मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई या मार्गावर सुरुवातीला एअर इंडिया सेवा चालविणार असून केंद्र शासनाने या विमानतळाचा उडान योजनेत सहभाग केला आहे .
मुंबई ते सिंधुदुर्ग या फ्लाईट चा नंबर 9 I 661 असून सकाळी 11. 35 वाजता तिथून निघून दुपारी 1.25 वाजता सिंधुदुर्ग चिपी येथे पोहोचेल तर परत प्रवासाचे सिंधुदुर्ग ते मुंबई फाईट चा नंबर 9I 662 असून ते दुपारी 1. 25 वाजता चिपी येथून निघून दुपारी 2.50 वाजता मुंबई पोहोचेल. हे विमान 70 सीट चे असून दोन बाय दोनच्या या सीट असतील. ऊद्घाटना दिवशी मुंबई सिंधुदुर्ग फाईट चे टिकीट 2520 रुपये असेल तर सिंधुदुर्ग ते मुंबईसाठी टिकीट 2621 रुपये असेल. मुंबईत गेल्यावर तिथून दिल्ली बेंगलोर कलकत्ता हैदराबाद चेन्नई येथे विमानाने जाण्यासाठी कनेक्टिंग विमानसेवा आहे. Ticket booking for Chipi started on Air India’s website

ML/KA/PGB

23 Sep 2021