मेळघाट मधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला

मेळघाट मधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला

अमरावती, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरासह अमरावती जिल्ह्यात संततधार पावसाचा जोर वाढला Heavy rains lashed Amravati district along with the city असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सार्वत्रिक पावसाने धरणांच्या पाण्याची पातळी वाढली असून, पूर्णा मध्यम प्रकल्पाचे सर्वच्या सर्व ९ दरवाजे, तर शहानूर मध्यम प्रकल्प व सापन धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत.  All the four gates of Shahnoor project and Sapan dam have been opened.पाण्याचा विसर्ग जोरात असल्याने धरण परिसरासह नदी, नाल्याकाठच्या तसेच सखल भागत राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील नद्या या पावसामुळे दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. सिपना नदीला To the river Sipna आलेल्या पुरामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, मेळघाटातील सुमारे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

अतिवृष्टीमुळे मेळघाटातील Due to heavy rains in Melghat अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कधी जोरात, तर कधी रिमझिम बरसणाऱ्या सरींमुळे शेकडो हेक्टर शेतांमध्ये पाणी साचले आहे.सातपुडा पर्वतरांगात काल झालेल्या पावसामुळे अचलपूर – बऱ्हाणपूर महामार्गावरील वाहतूक तीन तास विस्कळीत झाली होती.  Melghat गडगा, सिपना, खंडू, खापरा या नद्या ओसंडून वाहत आहेत. मेळघाटातील जवळपास 50 गावांचा संपर्क मुख्यालयासोबत तुटला आहे. सेमाडोह येथील भुतखोरा नाल्यासह हरिसाल, मांगिया या गावाजवळील नदीनाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. मेळघाटातील धारणी तालुक्यात 81.6 मिमी तर चिखलदरा तालुक्यात 40.3 मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे.Chikhaldara taluka has received 40.3 mm of rainfall.

ML/KA/PGB

24 July 2021