आरेतील मुख्य सिमेंट कॉंक्रीटच्या रस्तासाठी पालिका करणार ४६ कोटी ७५ लाखांचा खर्च

आरेतील मुख्य सिमेंट कॉंक्रीटच्या रस्तासाठी पालिका करणार ४६ कोटी ७५ लाखांचा खर्च

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरेतील दिनकर देसाई रस्ता मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत गेल्यानंतर या मार्गावरुन सुखकर प्रवास करणे प्रवाशांना सोयीस्कर झाले. परंतु जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी ७.२ किलो मीटर लांबीचा हा मुख्य रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा करण्यात यावा याला मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री तसेच पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या Mumbai Municipal Corporation माध्यमातून हा सिमेंट कॉंक्रीटचा बनविण्यात येणार आहे. यासाठी ४६ कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या माध्यमातून आरेतील आदिवासींसाठी विशेष आयोजित केलेल्या वॅक्सीन ड्राईव्हच्या कार्यक्रमावेळी याबाबतची घोषणा केली. विविध पाडे तसेच वस्तींपर्यंत जाणारे आरेतील अंतर्गत रस्तेही लवकरच सुस्थितीत करण्यात येणार असल्याचे आश्‍वासनही आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांनी यावेळी दिले.

गोरेगाव (पूर्व) येथील दिनकर देसाई Dinkar Desai मार्ग हा पूर्वी आरे प्रशासनाच्या ताब्यात होता. या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतुक असल्याने हा रस्ता वारंवार नादुरुस्त होवून वाहतूकीसाठी गैरसोयीचा ठरत होता. असे चित्र असतानाही या मार्गावरुन प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून आरे प्रशासन जबरदस्तीने टोल आकारत होते. या विरोधात वायकर यांनी वेळोवेळी आंदोलनेही केली. तसेच विविध आयुधाच्या माध्यमातून विधानसभेत प्रश्‍नही उपस्थित केले होते. या टोलवसुली विरोधात २०१४ रोजी जन आंदोलन करुन टोल बंद करुन हा रस्ता मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यात आला. त्यानंतर या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे.

पुर्व व पश्‍चिम उपनगराला जोडणारा हा रस्ता प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरत असल्याने हा मुख्य रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा करण्यात यावा, यासाठी वायकर यांची मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहारही केला. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांच्याकडे पत्राद्वारे तसेच त्यांनी बोलविलेल्या बैठकीत हा मुख्य रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा करण्यात यावा, अशी विनंतीही केली. त्यानुसार त्यांची ही रास्त मागणी आदित्य ठाकरे यांनी मान्य केली. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आरेतील हा ७.२ किलो मीटर लांबीचा हा मुख्य रस्ता (दिनकर देसाई मार्ग) सिमेंट कॉंक्रीटचा करण्यास येणार आहे. लवकर उर्वरीत प्रक्रीया पुर्ण करुन या रस्त्याच्या कामास सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी आरेतील आदिवासींसाठी राबविण्यात आलेल्या विशेष वॅक्सिन ड्राईव्हच्या कार्यक्रमावेळी दिली.The municipality will spend Rs 46.75 crore for the main cement concrete road in Are

ML/KA/PGB

4 Aug 2021