INDIA नावाबाबत याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली, दि.११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील २६ विरोधी पक्षांनी गेल्या महिन्यात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विरोधात एकत्र येऊन लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यासाठीची नवीन आघाडी INDIA या नावाने स्थापन केली होती. या आघाडीच्या नावावरून आता वादंग निर्माण झाला आहे. एवढचं नाही, तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात देखील पोहोचलं आहे. मात्र विरोधकांच्या इंडिया नावावरील संकट टळलं आहे.सर्वोच्च न्यायालयाने इंडिया नावाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने म्हटंल की, ही केवळ ‘प्रसिद्धीसाठी’ दाखल केलेली याचिका होती. त्यानंतर याचिकाकर्ता रोहित खेरीवाल यांनी याचिकाम मागे घेण्याचा निर्णय घेतला.
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती अमित महाजन यांच्या खंडपीठासमोर कलम २ नुसार भारत नावाचा वापर करण्यास मनाई असल्याचे कार्यकर्ते गिरीश भारद्वाज यांनी सांगितलं होतं. त्यानंतर न्यायालयाने राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले होते.
विरोधाभास म्हणजे 4 ऑगस्ट रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने 26 राजकीय पक्षांना आणि भारताच्या निवडणूक आयोगाला अशाच एका जनहित याचिकेवर INDIA हे नाव वापरण्यापासून रोखण्यासाठी नोटीस बजावली होती. यामुळे विरोधी आघाडीचा मोर्चाबांधणी करण्यातील मोठा कायदेशीर अडथळा आता दूर झाला आहे.
SL/KA/SL
11 Aug 2023