
ठाणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लॉकडाऊन झाल्यामुळे मुंबईतून गावी आलेल्या सुमन दाभोळकर यांनी दगडांच्या मूळ आकारात कोणतेही बदल न करता त्यावर रंगांची उधळण करून व्यक्तीचित्रे, निसर्गचित्रे साकारत दगडांना जिवंत करण्याची किमया साधली आहे.
सुमन दाभोळकर हे मूळचे सिंधुदुर्गातील कणकवलीमधले. आपल्या हातातील कलेने त्यांनी दगडांना मूर्त रूप दिले .
सुमन दाभोळकर यांनी मुंबईत फाईन आर्टचे शिक्षण घेतले. सध्या ते ठाण्यातील न्यू हॉरिझॉन स्कॉलर स्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून काम पाहतात.
मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर ते कणकवलीमध्ये आपल्या गावी आले. गावी आल्यानंतर त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या आजूबाजूला, गावातील नदीकाठच्या दगडांना बोलते केले .
कणकवलीमधील गड नदीकाठी मिळालेल्या वेगवेगळ्या आकाराच्या दगडांवर त्यांनी पोर्टेट बनवली आहेत.
दगडावर वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती साकारताना सुमन यांना आनंद मिळतो. त्यांनी साकारलेल्या कलाकृती सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा होत आहेत.
त्यांनी आतापर्यंत आईनस्टाईन, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, हरभजन सिंग,नसिरुद्दीन शहा, सोनू सूद, अब्दुल कलाम अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती आपल्या कलाकृतीत साकारल्या आहेत.
सुमन दाभोलकर यांनी साकारलेल्या सोनू सूदची कलाकृती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर, सोनू सूदनेही त्याच्या ट्विटरवर तो फोटो शेअर करून कौतुक केले .
सुमन दाभोळकर यांनी साकारलेल्या दगडांवरील कलाकृतींना मागणीसुद्धा आहे. त्यांच्या अनेक कलाकृती विकल्या गेल्या आहेत.
नदीकाठी मिळणाऱ्या दगडांना आहे त्या रूपात रंगवून वैशिष्ट्यपूर्ण अशी विविध प्रकारचे कलाकृती बनवताना सुमन यांना निसर्गाच्या सानिध्यात राहून काम करायला आवडते.
Tag- Suman-Dabholkar-stone-artist
ML/KA/DSR/16 JANUARY 2021