पाकिस्तानचा पहिला स्वदेशी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

इस्लामाबाद, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिक गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानने आता बऱ्याच कालावधीने एक लक्षणीय कामगिरी पार पाडली आहे. पाकिस्तानने चीनच्या जिउक्वान सॅटेलाइट लॉन्च सेंटरवरुन आपला पहिला स्वदेशी इलेक्ट्रो ऑप्टिकल (EO-1) उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षपण केले. त्यांच्या या पोस्टवर परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी अभिनंदन करत अवकाश तंत्रज्ञानात पाकिस्तानचे महत्व वाढत असल्याचे म्हटले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या पहिल्या उपग्रहाचे कौतुक करत त्याचे प्रेक्षपणाची बातमी शेअर केली. सोशल मीडिया एक्सवर त्यांनी उपग्रहाचे फोटो टाकले. त्यानंतर त्याचे काही लोकांनी त्यांची थट्टा उडवणे सुरु केले आहे. सोशल मीडियावर युजर त्याला पाण्याची टाकी म्हणत आहे. तसेच त्या उपग्रहाच्या फोटोसोबत पाण्याच्या टाकीचा फोटोही शेअर करत आहे. सोशल मीडियावर हा जोकचा विषय बनला. लोक त्या पोस्टवर खूप कॉमेंट करत आहे. अनेक मीम्स तयार केले गेले आहे
SL/ML/SL
18 Jan. 2025