#पाचवी ते दहावीपर्यंत शाळा 7 जानेवारीपासून सुरू करणारे पहिले राज्य ठरले पंजाब

चंडीगढ, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या वर्षी मार्चमध्ये देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली होती, त्यानंतर आतापर्यंत सर्व शाळा व महाविद्यालये बंद होती. पंजाब हे पहिले राज्य बनले आहे ज्याने पाचवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचे शिक्षणमंत्री विजय इंदर सिंगला यांनी बुधवारी सांगितले की पालकांच्या मागणीवरुन राज्य सरकारने गुरुवारपासून सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.ते म्हणाले, “शाळा उघडण्याची परवानगी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत दिली जात आहे. यावेळी विद्यार्थ्यांना शाळेत येऊन अभ्यास करता येणार आहे.

शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार शाळा व्यवस्थापकांनी कोविड-19 च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे आणि खबरदारीने काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. विजय इंदर सिंगला म्हणाले की, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी त्यांचा सल्ला देताना कोविड-19 च्या साथीच्या काळात मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची सूचना केली आहे.

शिक्षणमंत्री म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी आदेश केलेल्या सर्व सूचनांचे पालन केले जात आहे, कोरोनो विषाणूच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सर्व शाळा प्रशासनांना आरोग्य विभागाने बजावलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.”

Tag-Punjab/ became the first state to start schools from 5th to 10th from January 7

HSR/KA/HSR/ 7 JANUARY 2021