रशियाने प्रक्षेपित केले नउका सायन्स मॉड्यूल

रशियाने प्रक्षेपित केले नउका सायन्स मॉड्यूल

मॉस्को, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रशियाने (Russia) 14 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (ISS) नउका लॅब मॉड्यूल (Nauka Module) यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे. त्याच्या मदतीने रशियन अंतराळवीर आणखी वैज्ञानिक संशोधन करु शकतील. नउका ही रशियाची सर्वात मोठी अंतराळ प्रयोगशाळा असल्याचे सांगितले जात आहे. नउका रशियन मल्टीपर्पज रिसर्च मॉड्यूल (एमएलएम) या नावाने देखील ओळखले जाते.

प्रोटॉन-एम रॉकेटद्वारे झाली प्रक्षेपित
Launched by Proton-M rocket

नउका कझाकस्तानमधील रशियाच्या (Russia) बायकोनूर कॉसमॉड्रोम मधून प्रोटॉन-एम रॉकेटद्वारे अंतराळात प्रक्षेपित करण्यात आली. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की यावेळी नउका मॉड्यूल (Nauka Module) प्रोटॉन-एम रॉकेटपासून आउट्पोस्ट कक्षाच्या बाहेर यशस्वीपणे विभक्त झाली आहे. 29 जुलैला ती आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी (ISS) जोडली जाण्याचा अंदाज आहे.

नउका मॉड्यूलचे वजन 22 टन आहे
Nauka Module weighs 22 tons

22-टनाचे नउका मॉड्यूल (Nauka Module) 2007 मध्ये प्रक्षेपित करण्याची योजना तयार करण्यात आली होती. परंतु, त्याच्या प्रक्षेपणाला वेळोवेळी विलंब झाला. हे मॉड्यूल आपल्या सोबत युरोपिय रोबोटिक ओर्म ईआरए घेऊन गेले आहे. या रोबोटिक आर्मची रचना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील (ISS) रशियन (Russia) भागामध्ये काम करण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे. हे मॉड्यूल प्रक्षेपणानंतर 580 सेकंदांनी प्रक्षेपकापासून यशस्वीरित्या विभक्त झाले.

रशियन अंतराळ संस्थेकडून यशस्वी प्रक्षेपणाची पुष्टी
Confirmation of successful launch from the Russian space agency

रशियाची (Russia) अंतराळ संस्था रॉस्कोस्मोसने एका ट्विटमध्ये रॉकेटपासून मॉड्यूल यशस्वीपणे वेगळे झाल्याची पुष्टी केली आहे. रॉस्कोस्मोसने लिहिले की प्रक्षेपणानंतर टी + 9:40 मिनिटानंतर नउका मल्टिपरपज प्रयोगशाळा मॉड्यूल (Nauka Module) प्रोटॉन-एम वाहक रॉकेटपासून तिसर्‍या टप्प्यात विभक्त झाली. त्यानंतर या मॉड्यूलने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (ISS) आपले 8 दिवसांचे स्वतंत्र उड्डाण सुरू केले आहे.

29 जुलैला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडली जाणार नउका
The ship will be connected to the ISS on July 29

प्रक्षेपणानंतर 30 मिनिटानंतर रॉस्कोस्मोसने सांगितले की नउकाने त्याचे सौर पॅनेल आणि अँटेना यशस्वीरित्या तैनात केले आहेत. मॉड्यूल आता त्याच्या कक्षेत पुढे जाण्यासाठी स्वतःच्या इंजिनाचा वापर करेल अशी माहिती रशियन वृत्तसंस्था तासने दिली. हे मॉड्यूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी (ISS) 29 जुलैला जोडले जाणे निश्चित असल्याचे मानले जाते.

रशियन प्रयोगशाळा अनेक सुविधांनी सुसज्ज
Russian laboratory equipped with many facilities

42 फूट लांबीच्या आणि जास्तीत जास्त 14 फूट व्यासाच्या या मॉड्यूलमध्ये अनेक आधुनिक सुविधा आहेत. रशियन अंतराळ शास्त्रज्ञ या मॉड्यूलमध्ये आधीपेक्षा जास्त प्रयोग करु शकतील. यात प्रत्येक अंतराळवीरांसाठी एक स्वतंत्र बेड असेल. त्याशिवाय शौचालय, ऑक्सिजन जनरेटर आणि मूत्र फिल्टर करुन पाणी बनवणारी यंत्रणाही बसवण्यात आली आहे.

Russia has successfully launched a Nauka lab module for the International Space Station (ISS) after a 14-year wait. With its help, Russian astronauts will be able to do more scientific research. Nauka is said to be Russia’s largest space laboratory. Nauka is also known as the Russian Multipurpose Research Module (MLM).

PL/KA/PL/22 JULY 2021