मोबाईल फोन चोरी करणारी टोळी अटकेत

ठाणे, दि. 13 (एमएमसी न्युज नेटवर्क): ठाण्यातील कापुरबावडी पोलिसांनी मोबाईल फोन चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या एका टोळीला अटक केली. 4 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास ठाण्यातील मनोरमानगर येथील रहिवासी जयसिंग उमेकर (45) हे घरी येत असतांना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात अज्ञात आरोपींनी उमेकर यांच्यावर हल्‍ला करुन त्यांच्याजवळील मोबाईल फोन, पैसे व कागदपत्रासह पाकीट असा 12 हजार रुपये किमतीवी मालमत्ता चोरून नेली होती.

याप्रकरणी जयसिंग उमेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कापुरबावडी पोलीस ठाणे येथे कलम 392, 34 अन्‍वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रीक माहितीच्या आधारे गुन्हयातील आरोपींचा शोध चालू केला. माहिती तपास पथकाला मिळालेल्‍या बातमीच्‍या आधारे पोलिसांनी सापळा रचून गुन्हयातील आरोपी गोविंद राजु चव्हाण (वय 20) व कार्तिक दिलीप निर्मल (20) या दोघांना अटक केली. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून चोरी केलेला मोबाईल फोन व गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल त्‍यांच्‍याकडून हस्तगत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुन्हयातील मोबाईल फोन विक्री करण्यासाठी मदत करणारे आवेश अनीस शेख (20), इम्तियाज अर्षद खान (38) आणि अश्पाक मलिक शेख (32) या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

 

Tag- Robbery-gang-arrested

SW/KA/DSR/13 JANUARY 2021