खालापूर मधील नदीच्या बाजूला असणाऱ्या गावातील सुमारे २०० घरात घुसले नदीचे पाणी.

खालापूर मधील नदीच्या बाजूला असणाऱ्या गावातील सुमारे २०० घरात घुसले नदीचे पाणी.

खालापुर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील खालापुर Khalapur in Raigad district तालुक्यांत काल दिनांक २१ जुलै रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसांमुळे पाताळगंगा नदीच्या पात्रातील पाणी वाढले The water in the river Patalganga rose व ते पाणी नदीच्या जवळपास असणाऱ्या गावांमध्ये असलेल्या दोनशेहून अधिक घरांमध्ये शिरले water broke into more than two hundred homes असल्याची माहिती मिळताच खालापूर तहसीलदार प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले.

खालापुरचे तहसिलदार इरेश चप्पलवार  Tehsildar of Khalapur Iresh Chappalwar यांनी रात्री ३.०० वाजता घटनास्थळी दाखलं होऊन परिस्थिती ची पाहणी केली व येथील पूर सदृश्य परिस्थिती चा आढावा घेतला. सुमारे दोनशे कुटुंबीयांना योग्य त्या सुरक्षित स्थळी स्थलांतर केले.About two hundred families were evacuated  त्या सर्व कुटुंबीयांना अन्न धान्य देण्यात आले असून त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.

खालापूर तालुक्यात असलेल्या पाताळगंगा नदीचे Of the river Patalganga पात्र वाढल्यामुळे सध्या स्थानिक नागरिकांना आपल्या घरीच सुरक्षित राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत.

अतिवृष्टी मुळे मौजे-खोपोली येथील सिध्दार्थनगर 27 कुटुंब व प्रज्ञानगर मधील 26 कुटुंबातील घरामध्ये पावसाचे पाणी शिरले होते. तेथील एकूण :-53 कुटुंबाना सिध्दार्थ नगर येथील बुद्ध विहारामध्ये In the Buddha Vihara at Siddhartha Nagar व आजूबाजूच्या उंचावरील घरामध्ये स्थलातरीत करण्यात आले आहे.  तसेच मौजे-जांबरूग बौध्दवाडा ,बीडखुर्द गावामध्ये सुद्धा पाणी शिरले Water also infiltrated in Beedkhurd village होते तेथील कुंटुंबाना रा.जि.प.शाळेमध्ये स्थलातरीत करण्यात आले आहे.

या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून मौजे-जांबरूग येथील एका व्यक्तीला किरकोळ इजा झाली होती, त्यास उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, खालापूर येथे हलविण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती ठिक आहे. River water infiltrated about 200 houses सध्या पावसाचे पाणी ओसरले आहे. परंतु नदीच्या पाण्याची पातळी वाढलेलीच आहे.

ML/KA/PGB

22 July 2021