मिरा रोडमध्ये रेमडेसिविरचा काळाबाजार करणार्‍या दोन जणांना अटक

मिरा रोडमध्ये रेमडेसिविरचा काळाबाजार करणार्‍या दोन जणांना अटक

भाईंदर, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मीरारोडमध्ये (Mira road) रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनची सोळा हजार रुपयांना विक्री करणार्‍या एका महिलेसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. रेमडेसिविरची चढ्या दराने विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे (MBVV police commissionerate) उपायुक्त अमित काळे यांना मिळाली होती.

पाच इंजेक्शन जप्त
Five injections seized

एका बोगस गिर्‍हाईकाच्या माध्यमातून आरोपींशी संपर्क करण्यात आला. त्यावेळी एका इंजेक्शनसाठी सोळा हजार रुपयांची मागणी करण्यात आली. सौदा नक्की झाल्यावर अमित काळे यांच्या नेतृत्वाखालील पोलीसांच्या एका विशेष पथकाने मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सापळा रचून दोघांना मिरा रोड (Mira road) येथून ताब्यात घेतले. यात एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून पाच रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शन तसेच एक दुचाकी आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी आणखी कोणाला इंजेक्शनची विक्री केली आहे का याची पोलीस चौकशी करत आहेत.

 

Two people, including a woman, have been arrested in Mira Road for selling Remdesivir injections for Rs 16,000. Amit Kale, deputy commissioner of the Mira Bhayander-Vasai Virar Police Commissionerate had received information that remedesivir was being sold at inflated rates.

 

PL/KA/PL/21 APR 2021