सहा महिन्यांच्या मुलांसाठीही कोरोनाची लस लवकरच येणार

सहा महिन्यांच्या मुलांसाठीही कोरोनाची लस लवकरच येणार

वॉशिंग्टन, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फायझर Pfizer आणि त्याची भागीदार जर्मन कंपनी बायोएनटेक (Bio-entec) यांनी आपली कोव्हिड -19 लस (covid-19 vaccine) लहान मुलांसाठीच सुरक्षित असल्याचा दावा केला असला तरी, या दृष्टीने प्रयत्न करणारी ती एकमेव कंपनी नाही. जवळपास अर्धा डझन कंपन्या मुलांसाठी कोरोना विषाणू लस बाजारात आणण्याच्या स्पर्धेत आहेत. कंपन्यांचा असा दावा आहे की लवकरच सहा महिन्यांच्या मुलांसाठीही कोरोनाची लस बाजारात उपलब्ध होईल.

जागतिक स्तरावर आतापर्यंत बहुतेक कोव्हिड -19 लस (covid-19 vaccine) प्रौढांसाठीच बाजारात आल्या आहेत. असे मानले जात आहे की लहान मुलांपेक्षा वयात आलेल्या मुलांना संसर्ग होण्याचा धोका खुपच जास्त असतो. परंतु तज्ञांचे मत आहे की साथीला आळा घालायचा असेल तर मुलांनाही लस द्यावी लागेल. फायझर Pfizer आणि बायोएनटेक लवकरच त्यांच्या लसींच्या तातडीच्या वापरासाठी मंजुरीसाठी अर्ज करतील, परंतु त्याव्यतिरिक्त बर्‍याच कंपन्या स्पर्धेत आहेत. अमेरिकेची कंपनी मॉडर्ना देखील 12 ते 17 वर्षांच्या मुलांवर कोरोना लसीच्या परिणामाचा अभ्यास करीत आहे आणि लवकरच त्याचा अहवालही समोर येणार आहे.

सूत्रांचे म्हणणे आहे की मॉडर्नाच्या संशोधनामध्ये आढळलेली तथ्ये खूपच सकारात्मक आहेत. याचा परिणाम म्हणून, यूएसएफडीएने याआधीच फायझर आणि मॉडर्नाला 6 वर्षापर्यंतच्या नवजात मुलावरील कोव्हिड -19 च्या प्रभावावर संशोधन करण्यास परवानगी दिली आहे. या दोन कंपन्यांव्यतिरिक्त, अ‍ॅस्ट्रॅजेनेकाने गेल्याच महिन्यात ब्रिटनमध्ये 6 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांवर आपल्या लसीच्या परिणामाबद्दल संशोधन सुरू केले आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनदेखील संशोधन सुरू करणार आहे, तर चीनच्या सिनोव्हॅक कंपनीने अलीकडेच दावा केला होता की त्यांनी 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आपली लस सुरक्षित असण्यासंबंधीची प्राथमिक आकडेवारी चीनच्या नियामकांना दिली आहे.

मुलांसाठी डोस ठरविणे हे एक आव्हान असेल
Determining the dose for children will be a challenge

मुलांना कोव्हिड -19 लसीचा (covid-19 vaccine) डोस देण्यापूर्वी त्याचे प्रमाण निश्चित करणे कंपन्यांसाठी सर्वात मोठे आव्हान असल्याचे मानले जाते. फायझरने 12 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांना 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या समान डोस दिला होता, परंतु पुढील महिन्यापासून सुरू होणार्‍या त्यापेक्षाही लहान मुलांवरील चाचण्यांमध्ये कंपनी विविध प्रकारचे डोस वापरत आहे.

फायझरची लस 12 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठीही परिणामकारक
The Pfizer vaccine is also effective for children older than 12 years

फायझरने Pfizer दावा केला आहे की त्यांची कोव्हिड -19 ही लस (covid-19 vaccine) 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि प्रौढांप्रमाणेच कोराना विषाणूची साथ रोखण्यासाठी परिणामकारक आहे. फायझरने हा दावा 12 ते 15 वर्षे वयोगटातील 2260 अमेरिकन स्वयंसेवकांना कोव्हिड -19 लस दिल्यानंतर आलेल्या प्राथमिक आकडेवारीच्या आधारे केला आहे. फायझरचा हा दावा मुलांना शाळेत परत आणण्याच्या दिशेने खूप महत्वाचा मानला जातो. फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्लबा बाउर्ला यांनी सांगितले की, त्यांची कंपनी लवकरच युएसएफडीए आणि युरोपियन नियामक यांच्याकडे 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी लसीच्या वापरासाठीची तातडीची मंजुरी मिळावी यासाठी अर्ज दाखल करेल.

Although Pfizer and its German partner Bio-entec claim that their covid-19 vaccine is safe for young children, it is not the only company trying to do so. Nearly half a dozen companies are competing to bring the corona virus vaccine to market for children. The companies claim that the corona vaccine for six-month-old babies will soon be available in the market.

PL/KA/PL/1 APR 2021