जीडीएमओ आणि तज्ञांच्या 89 जागांसाठी सीमा सुरक्षा दलाची भरती

मुंबई, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (जीडीएमओ) आणि तज्ञांच्या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 89 पदांची भरती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी उमेदवारांची निवड ही कोणतीही परीक्षा न घेता थेट मुलाखतीच्या आधारे केली जाईल. इच्छुक उमेदवार 21 जून ते 30 जून या कालावधीत वॉक-इन-मुलाखतीत उपस्थित राहू शकतात.

 

पदांची संख्या – 89

Number of post

जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर 62

स्पेशालिस्ट 27

 

पात्रता

Qualification

जीडीएमओ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप केली आहे त्यांनादेखील यासाठी पात्र मानले जाईल. त्याचबरोबर संबंधित पदवीधर पदव्युत्तर पदवी किंवा पदविका धारक तज्ज्ञ पदासाठी अर्ज करू शकतात.

 

पगार

Salary

जीडीएमओ – 75,000 रुपये

स्पेशालिस्ट – 85,000 रुपये

निवड प्रक्रिया

Process

या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

 

अर्ज कसा करावा

How to apply

या पदांवर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार आवश्यक कागदपत्रांसह 21 जून ते 30 जून 2021 या कालावधीत संचालक सीमा सुरक्षा दल, ब्लॉक क्रमांक 10, सीजीओ कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली -03 येथे वॉक-इन-मुलाखतीत सामील होऊ शकतात.

Candidates applying for GDMO posts must have an MBBS degree. Apart from this, candidates who have done internships will also be considered eligible for this. At the same time, post graduate degree or diploma holders in related specialty can apply

PGB/KA/PGB

17 May 2021