#राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने असेल प्रौढ शिक्षणाची नवीन योजना

नवी दिल्ली, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सन 2030 पर्यंत सरकार 100 टक्के साक्षरतेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रौढांच्या शिक्षणाची नवीन योजना सुरू करणार आहे. यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या विविध सूचना आणि शिफारसी लागू केल्या जातील. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ही नवीन योजना 2021-26 या आर्थिक वर्षात राबविली जाईल.

ते म्हणाले की, या योजनेबाबत विचारविनिमय करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, परंतु अद्याप या योजनेचे नाव निश्चित झाले नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रौढ शिक्षणाच्या नवीन योजनेसंदर्भात खर्च वित्त समितीच्या (ईएफसी) नोटला अंतिम प्रक्रिया देण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रौढ शिक्षण कार्यक्रमांतर्गत सरकारने वाचन आणि लेखन मोहीम सुरू केली आहे, ज्या अंतर्गत 15 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे लोक अभ्यासानंतर साक्षर होऊ शकतात. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की वाचन व लेखन मोहीम 31 मार्च 2021 पर्यंत आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की दरम्यानच्या काळात प्रौढांच्या शिक्षणासंदर्भात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अनेक शिफारसी केल्या गेल्या आहेत, अशा नव्या योजनेत या शिफारसींचा समावेश असेल. ते म्हणाले की नवीन योजनेबाबत मंजुरी प्रक्रिया अंतिम केली जात असून सल्लागार समिती या विषयावर विचारविनिमय करीत आहे. त्याअंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) साक्षरता मूल्यांकन या विषयावर लक्ष ठेवेल.

Tag-The new plan for adult education/national education policy

HSR/KA/HSR/ 11 JANUARY 2021