नरेंद्र मोदी यांनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा

४ जूनला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दिला. लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीत मंजूर झाला होता. तो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे सादर केल्यानंतर राष्ट्रपतीनी पंतप्रधानपदाचा राजीनामा मंजूर केला. मात्र, नवीन सरकार येईपर्यंत मोदी काळजीवाहू पंतप्रधान असतील.